राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भव्य रॅली

नागपूर :- राष्ट्रीय मतदार दिवसाचे अनुषंगाने आज सकाळी वसंतराव नाईक शासकीय विद्यालय येथून स्विप अंतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, वर्शिप अर्थ फाऊंडेशन, राजीव स्पोर्टस् फाऊंडेशन व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीत सुमारे 700 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वयंस्पूर्त सहभाग नोंदविला. ही रॅली वसंतराव नाईक कॉलेज येथून सुरु करण्यात आली पुढे झिरो मॉईल, मेट्रो स्टेशन, शासकीय विज्ञान संस्था, आकाशवाणी चौक, विधानभवन, संविधान चौकातून वसंतराव नाईक महाविद्यालयात परत आली.

वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संचालक कुंभारे, राजीव फाऊंडेशनचे समन्वयक संदीप धोटे, अर्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय दुबे उपस्थित होते. रॅलीचे नियोजन व व्यवस्थापन निवडणूक कार्यालयाचे तहसीलदार वैशाली, नायब तहसीलदार रणजीत दुसावार यांनी केले.

NewsToday24x7

Next Post

मताचं सामर्थ समजून घ्या – अभिमन्यु बोदवड

Fri Jan 26 , 2024
– राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात नागपूर :- लोकशाही शासन व्यवस्थेत मतदानाला अनन्य साधारण महत्व आहे. समाजातील सर्व घटकांना समान संधी या व्यवस्थेत मिळते. लोकशाही शासन व्यवस्थेत संविधान हे संचित असून निवडणूक प्रक्रिया महत्वाची आहे. मतदार नोंदणी आवश्यक असल्याने युवा मतदारांनी मतदार नोंदणी करावी व मताचे सामर्थ समजून घ्यावं, असे उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोदवड यांनी सांगितले. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदान दिनाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com