नागपूर :- नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बॅंकेचे अध्यक्ष ईष्वर चंद्रभान मेश्राम यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. अध्यक्ष पदाच्या झालेल्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यासाठी निबंधक कार्यालयातर्फे अध्यासी अधिकारी म्हणून राजेन्द्र कौसडीकर, उपनिबंधक शहर-1, सहकारी संस्था, नागपूर यांची नियुक्ती करण्यात आली व दि. 31/07/2024 ला दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
या निवडणुकीत गोविंदा सिध्देष्वर दावळे यांची अध्यक्षपदी निवड झाली. गोविंदा सिध्देष्वर दावळे यांना 21 सदस्यीय संचालक मंडळात 12 मते प्राप्त झाली. तर त्यांची प्रतिस्पर्धी कमल माधवराव घोडमारे यांना 09 मते प्राप्त झाली. या निवडणुकीसाठी लोकक्रांती पॅनलचे प्रणेते दयाशंकर तिवारी यांचे नेतृत्वाखाली सर्व आजी-माजी पदाधिकारी प्रामुख्याने सर्वश्री. सुनिल शास्त्री, ओमप्रकाश भुते, ईष्वर मेश्राम, राजेन्द्र ठाकरे, राजकुमार कनाठे, राधेष्याम निमजे, सुशील यादव, दिलीप चैधरी, विजय काथवटे, प्रदीप डाखोळे, शशीकांत आदमने, राजू भिवगडे तसेच ज्येष्ठ संचालक दिलीप देवगडे, माजी अध्यक्ष नितीन झाडे, तथा संचालक सर्वश्री. धनराज मेंढेकर, प्रशांत डुडुरे, बळीराम शेंडे, सत्येन्द्र पाटील, आनंद बोरकर, अनिल बारस्कर, गजानन जाधव यांचे सहकार्य लाभले.