नागपूर :- यातील आरोपी मे. गरवीत इनोव्हेटीव्ह प्रमोटर लि. चे मालक संजय भाटी व त्याचे इतर साथीदार यांनी दिलेल्या स्किम वर विश्वास ठेवुन फिर्यादी व इतर गुंतवणुकदार असे एकूण २११ लोकांनी एकूण ३०० पेक्षा जास्त बाईक बोटीमध्ये रु. ४,४९,६७,००२/- इतकी रक्कम गुंतविलेली असून आजपावेतो यातील अटक आरोपीतांनी फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांची फसवणुक केली. मे. गरवीत इनोव्हेटीव्ह प्रमोटर लि. कंपनी, कंपनीचे व्यवस्थापक अटक आरोपी नामे संजय रतनसिंग भाटी व त्याचे साथीदार यांनी वरील प्रमाणे “बाईक बोट” स्कीममध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवणुक केल्याने फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांना आर्थिक दामदुपटीचे व अशक्य प्राय प्रलोभन व आमिष देवुन त्यांची फसवणुक केली आहे.
नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी नामे १) संजय रतनसिंग भाटी, रा. ग्राम चित्ती, पो. ठा. दनकौर, जिल्हा गौतम बुध्द नगर, उत्तर प्रदेश २) राजेश भारद्वाज शंकरलाल शर्मा, रा. खुर्जा, पो. ठा. खुर्जा, जिल्हा बुलंदशहर, उत्तरप्रदेश ३) करनपाल सिंग केहारी सिंग, रा. हाउस नं. एफ ८३. गंगा सागर रोड, पो. ठा. गंगासागर, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेश यांना आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर पथकाने भरतपुर राज्य राजस्थान येथुन ताब्यात घेतले. नमुद आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करून पी. सी. आर. कामी मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई पोलीस उप आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली रिजवान शेख, सहा. पो. निरीक्षक यांचेसह पोहवा भगवान बुधवंत, प्रदिप वाळके, उपेंद्र तायडे, सुषमाकर जांभुळकर, अजय घाटोळ पोशि राहुल ठाकुर चानापोशि विलास इंगळे यांनी कारवाई पुर्ण केली.