माहे डिसेम्बर 2022 ची रोहयो मजूरी खात्यात जमा करा -कोदामेंढी येथील मजूरांची मागणी

कोदामेंढी :- येथील ग्रा. पं मधे महात्मा गाँधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक वृक्षलगवड़ची कामे सुरु आहेत. जानेवारी 2023 ते मे 2023 या पाच महिन्याची या वर्षाची मजूरी मजूरांच्या खात्यात जमा झालेली आहे. मागच्या वर्षाची माहे डिसेम्बर 2022 ची मजूरी अजूनही खात्यात जमा न झाल्याने, प्रलंबित मजूरी खात्यात जमा करण्याची मागणी कोदामेंढी येथील मजूर योगिता गिरमेकर,काजल मोहुर्ले, जया साखरे, देवका खोब्रागडे, कविता गिरमेकर सह प्रलंबित मजूरी असलेल्या सर्व रोहयो मजुरान्नी केली आहे.

याबाबत पं. स. मौदा येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल ठेंगे यांना एक महिन्यापूर्वी पासून भ्रमणध्वनिवरुन दोन ते तीनदा विचारपूस केली असता, त्यांनी फंड उपलब्ध नसल्याने कोदामेंढीतील मजूरांचेच नव्हे तर सम्पूर्ण नागपुर ज़िल्ह्यातील मजूरांचे मजूरी प्रलंबित असल्याचे सांगितले.शासकीय कर्मचाऱ्याचे पगार दर महिन्याला खात्यात जमा करण्यासाठी शासनकड़े फंड असतो, मात्र मजूरांचे पाच महिन्यापूर्वीचे पगार खात्यात जमा कारण्यासाठी शासनाकड़े फंड नसल्याने मजूरवर्ग संताप व्यक्त करत आहे.

NewsToday24x7

Next Post

प्रफुल पटेल – राज्यपाल भेट

Sat May 27 , 2023
मुंबई :- खासदार प्रफुल पटेल यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com