नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.13) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 10,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच नायलॉन मांजाच्या विरोधात 100 आस्थापनेची तपासणी करण्यात आली.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग न.8, टिमकी येथील साईबाबा स्विट सोनपापडी यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत लालगंज, झेंडा चौक येथील फरसान स्विट यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत धावडा गल्ली येथील विजय जैन यांच्याविरुध्द ट्रकने मनपाचे सिवरेज चेंबर तोडल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धंतोली झोन अंतर्गत PMG Layout, प्रभाग 35, नरेन्द्रनगर येथील M/s Livello Homes यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत रिलायन्स हॉस्पीटल जवळील M/s KGN Tradings यांच्याविरुध्द दुकानातील कचरा ब्लॅक स्पॉट परिसरात फेकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगलवारी झोन अंतर्गत एसबीआय कॉलनी राजनगर येथील उर्मिला अपार्टमेन्ट यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.