संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड रोड रहिवासी महिलेला क्रेडिट कार्ड चे सेटलमेंट करून देण्याचे हमी देत आरोपी व त्याच्या मित्राने 22 हजार 500 रुपयाने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून यासंदर्भात फसवणूक झालेले पीडित महिला फिर्यादी निकिता दीपक नाटकर ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी फसवणूक करणारे आरोपी जफर आझमी इकबाल आझमी वय 30 वर्षे रा सुफिंनगर कामठी व त्याचा मित्र विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी च्या पतीचे वन कार्ड कंपनीचे क्रेडिट कार्ड चे सेटलमेंट करून देणयासाठी उपरोक्त नमूद दोन्ही आरोपीना 22 हजार 500 रुपये दिले व सेटलमेंट झाले नसल्याने दिलेली रक्कम परत मागितले असता आरोपीने रक्कम परत करण्यास टाळाटाळ केले यावरून स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.