संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मणिपूर ची घटना ही अतिशय लज्जास्पद असून या प्रकरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर चे मुख्यमंत्री यांचा महीला काँग्रेस तर्फे कामठी तालुक्यातील रणाळा येथे जाहिर निषेध करण्यात आला.व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर चे मुख्यमंत्रीनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी नागपूर जिल्हा परिषद च्या महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे म्हणाल्या की मणिपूर येथील निरपराध महिलावर झालेल्या अत्याचाराची घटना ही माणुसकिला काळिमा फासणारी आहे.केंद्र सरकारच्या गृह विभागाने या प्रकरणाकडे गंभीर्याने बघणे आवश्यक असतानाही त्यांनी ते बघितले नाही दरम्यान कांग्रेस चे कामठी मौदा विधानसभा चे नेते व नागपूर जिल्हा परिषद चे माजी जी. प.अध्यक्ष सुरेश भोयर यांनी सांगितले की कारगिल युद्धातील वीर जवानांच्या पत्नीवर अत्याचार होणे ही लज्जास्पद बाब आहे.निरपराध महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अद्याप अटक झालेली नाही ही त्याहुन अधिक शरमेची बाब आहे या प्रकरणातील आरोपीना अटक करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा थोठवावी अशी मागणी सुरेश भोयर यांनी केली.
याप्रसंगी कामठी पंचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे म्हनाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शहा हे अफूच्या गोळ्या खाऊन झोपले आहेत का?त्याना महिलेवर झालेला अत्याचार दिसत नाही.महिलेवरील अत्याचार थांबलेच पाहिजेत अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडु असा इशारा देण्यात आला.
मणिपूर येथे महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी महिला कांग्रेस पार्टी च्या वतीने काल रणाळा येथे काळी फित बांधून मोमबत्ती जाळून निषेध नोंदविण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे,माजी जी. प. अध्यक्ष सुरेश भोयर ,जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राउत , महिला व बाल कल्याण सभापती प्रा.अवंतिका लेकुरवाळे, कामठी पंचायत समिती सभापती दिशा चनकापुरे,पंचायत समिती सदस्य दिलीप वंजारी , सुमेध रंगारी.सोनु कुथे ,येरखेडा ग्रा प सरपंच सरिता रंगारी,भिलगाव ग्रा प सरपंच फलके ,माजी नगरसेविका ममता कांबळे आणि समग्र महिला उपस्थित होत्या.