महिला समुदेशन केंद्र संचालिका पतीचा संशयास्पद मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- येरखेडा ग्रामपंचायतच्या माजी सदस्य व कामठी महिला समूपदेशन केंद्राच्या संचालिका शितल चौधरी यांचे पती मुकेश चौधरी वय 50 वर्षे रा ऑरेंज सिटी टाऊनशीप कामठीचा संशयास्पद अपघाती मृत्यु झाल्याची घटना गतमध्यरात्री उघडकीस आली असली तरी या घटनेतील मृत्यु प्रकरणात घाती की अपघाती मृत्यु या शंकास्पद चर्चेला उधाण आल्याने मृत्यूचे खरे कारण हे शवविच्छेदन अहवाला नंतर स्पष्ट होईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक मुकेश चौधरी हे येरखेडा येथे आयोजित मिरवणुक कार्यक्रम आटोपून सहपाठी मित्राला येरखेडा येथील दुर्गा चौकात सोडून ऑरेंजसीटी टाऊनशीप येथील राहत्या घरी दुचाकी क्र एम एच 40 व्ही 5679 ने एकटेच रणाळा मार्गे जात असता झालेल्या दुचाकी अपघातात रक्तबंबाळ स्थितीत रस्त्याच्या कडेला पडून होते. मृतकाचा चेहरा हा रक्ताने माखलेला होता.बराच वेळ होऊनही मृतक घरी न पोहोचल्याने घरमंडळी चिंतेत होते तर दुसरीकडे सदर मृतक मृत्यूशी झुंज देत थंडीच्या कडाक्यात रस्त्याच्या कडेला पडलेले होते.दरम्यान या मार्गाने काही मंडळी कामठीकडे येत असताना सदर मृतक हा गंभीर जख्मि अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला तर हृदयाची कंपन सुरू होती यावेळी मदतीची धाव घेत घरमंडळीना माहिती देत त्वरित उपचारार्थ लाईफ लाईन हॉस्पिटल येथे हलविण्यात आले.परिस्थिती नाजूक असल्याने आज सकाळी 10 दरम्यान नागपूर च्या प्रसिद्ध नामवंत खाजगी रुग्णालयात हलविन्यात आले. मात्र सदर मृतक हा ब्रेनडेड असल्याने उपचारा अंती मरण पावल्याची घटना आज दुपारी 2 दरम्यान घडली.मात्र या घटनेने चौधरी कुटुंबियात एकच शोककळा पसरली तर सदर मृत्यू प्रकरण हे अपघाती नसून घात करून मृत्यू झाला असल्याचा दावा मृतकाचे घरमंडळी करीत आहेत.यासंदर्भात मृतकाचा मुलगा शुभम चौधरी यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून संशयास्पद स्थितीवर नियंत्रण ठेवत त्या दिशेने तपासाला गती दिली आहे.

पोलिसांनी या मृत्यू प्रकरणात तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकाचे पार्थिव शविच्छेदनार्थ नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले असून या शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

NewsToday24x7

Next Post

पाचही व्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा तयार होणार एकत्रित पर्यटन आराखडा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Thu Jan 25 , 2024
· वनामृत होणार आता वन विभागाचा ब्रॅण्ड · एकिकृत “वंदे मातरम वनसेवा केंद्रां”ची निर्मिती करणार मुंबई :- राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प हे आपले वैभव आहे. हे वैभव जगापुढे येणे आणि पर्यटकांना त्याठिकाणी आकर्षित करण्यासाठी या सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या सोयीसुविधांमध्ये एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी पाचही व्याघ्र प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्याचप्रमाणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com