छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आज शुक्रवार 10 मार्चला तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती प्रित्यर्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पक्ष संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक कामठी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेचे अभीषेक पुजन नागपूर ग्रामीण जिल्हा संघटक प्रमुख राधेश्याम हटवार, तालुका प्रमुख कुणाल चिकटे, शहर प्रमुख मुकेश यादव, कामगार सेनेचे मनोहर अगुटलेवार यांच्या हस्ते पश्र्चात सामुहिक आरती जगदंब ढोल ताशा पथकाचे वाद्दवृंदाचे निनादात तालावर करण्यात आली.राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने ढोल ताशा पथकाचे अप्रतीम अशा सामुहिक वंदना व प्रार्थना तसेच जय भवानी जय शिवाजी व हर हर महादेव या गर्जनेने परिसर दणाणून निघाला.यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नागपूर जिल्हा संघटक ग्रामीण प्रमुख राधेश्याम हटवार, तालुका प्रमुख कुणाल चिकटे, शहर प्रमुख मुकेश यादव, कामगार सेनेचे प्रमुख मनोहर अगुटलेवार, उपाध्यक्ष सुंदरसिंग ठाकुर, माजी नगरसेवक राजू पोलकमवार, माजी तालुकाप्रमुख चेतन तुरस्कर,भाविसे उपजिल्हाप्रमुख विनोद यादव,वसंत सातपुते, तालुका प्रमुख राजु चहांदे,बाळु शुक्ला, प्रामुख्याने भदन्त बुध्दरत्न संबोधी,संगीता लांजेवार तर सेनेचे सुनील काटगायै,सुरज दास,मुन्ना प्रजापती,बापु बारई, कमल सकतेल, ओमप्रकाश जोशी, महादेव बावनकर,जितु परमार, रोशन यादव,उमेश भोकरेविनोद मोरे,सुनील बांडेबुचे,अनिल गावंडे, शंकर तलमले,चुन्नीलाल खांडेकर,गणेश मोहरा,बंटीकाळे, अमोल तडसे,प्रमोद डेंगे,परवीन खान,आणखी मोठ्या संख्येने शिवसैनिक,नगरवाशी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com