नागपूर :- दिनांक १४.०४.२०२४ ते दिनांक १५.०४.२०२४ रोजी दरम्यान, नागपुर शहर पोलीसांनी, पोलीस ठाणे हद्दीत संयुक्तिक कारवाई केली.
१) गुन्हेशाखा युनिट क. २ पोलीसांनी पोलीस ठाणे कोराडी हद्दीत कोराडी नाका, साई ट्रेडर्स मागील, परिसरात कारवाई करून, आरोपी राजीक शेख रफीक शेख, वय ३२ वर्षे, रा. जयभिम नगर, महादुला, नागपुर याचे ताब्यातुन एक धारदार लोखंडी टोकदार चाकु किंमती अंदाजे ३००/- रू. चा मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीने शरख बाळगुन मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपी विरूध्द कलम ४,२५ भा.ह.का., सहकलम १३५ म. पो.का. अन्वये कारवाई करून आरोपीस अटक करण्यात आली.
तसेच युनिट क. २ पोलीसांनी पोलीस ठाणे मानकापुर हद्दीत मानकापूर उड्डानपुलाखाली, घाटा जवळ, मिव्यलेल्या माहितीवरून कारवाई करून, आरोपी सुशील सुरेश बोपचे, वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ६. ताजनगर, झोपडपट्टी, नागपुर याचे ताब्यातुन एक लोखंडी चाकु किंमती अंदाजे २००/-रू. चा मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीने मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपी विरूध्द कलम ४.२५ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो.का. अन्वये कारवाई करून आरोपीस अटक करण्यात आली.
२) यशोधरानगर पोलीसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असत्ता, बंद नवाज नगर, गल्ली नं. ८. रोडवर शस्त्र घेवुन धुमधाम करणारा, आरोपी अखील कुरेशी अयुब कुरेशी, वय २४ वर्षे, रा. बंदे नवाज नगर, नागपुर याचे ताब्यातुन एक लोखंडी हत्तीमार चाकु किंमती अंदाजे २००/- रू. वा मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीने शस्त्र बाळगुन मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपी विरुध्द कलम ४,२५ भा.ह.का., सहकलम १३५ म. पो.का. अन्वये कारवाई करून आरोपीस अटक करण्यात आली.
तसेच यशोधरानगर पोलीसांचे पथकाने पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असता, यादव नगर, हाऊसिंग बोर्ड सोसायटी, सुरज किराणा जवळ राहणारा आरोपी हा घरा समोर हातात तलवार घेवुन धुमधाम करीत आहे अशा माहितीवरून घटनास्थळी गेले असता, आरोपी मोहम्मद जीशान मोहम्मद खालील उर्फ बाबा लंगडा, वय २४ वर्षे, हा समक्ष मिळून आला, त्याने ताब्यातुन एक लोखंडी तलवार किंमती अंदाजे ५००/-रू, गी मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीने शस्त्र बाळगुन मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने आरोपी विरुध्द कलम ४,२५ भा.ह.का., सहकलम १३५ म.पो.का. अन्वये कारवाई करून आरोपीस अटक करण्यात आली.
३) हिंगणा पोलीसांचे पथकाने पोलीस ठाणे हद्दीत मौजा कान्होलीबारा येथे आरोपी राजु मारोती बुंडे वय ३२ वर्ष रा. कान्होलीबारा, ता. हिंगणा याचे घरी रेड कारवाई करून त्याचे ताब्यातुन एक प्लास्टीक डबकीत १५ लिटर मोहाफुलाची गावठी दारू किंमती अंदाजे १,५००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीविरूध्द कलम ६५(ई) म. दा.का. अन्वये गुन्हा दाखल करून, कारवाई करण्यात आली.
४) पारडी पोलीसांचे पथकाने पोलीस ठाणे पारडी हद्दीत आरोपी मनोहर रतीरामजी राखडे वय ५० वर्ष रा. पुनापुर रोड, दत्त चौक, गंगाबाग, पारडी, नागपूर येथे आरोपीचे घरी रेड कारवाई करून, आरोपीचे ताब्यातुन देशी दारू प्रिमीयमच्या १५ बॉटल, व दारू विक्रीचे नगदी १.६५०/- रू असा एकूण २,७००/- रू. मुद्देमाल अवैधरित्या मिळुन आल्याने, नमुद मुद्देमाल जप्त करून, आरोपीविरूध्द कलम ६५(ई) म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल करून, कारवाई करण्यात आली.
५) तहसिल पोलीसांचे पथकाने पोलीस ठाणे हद्दीत चिन्नाबाईपेठ, टोपण्याचे विहीरी जवळ रेड कारवाई करून आरोपी श्री श्याम धार्मीक वय ३७ वर्ष रा. मस्कासाथ, मेनन जमातचे मागे, नागपूर याचे ताब्यातुन दोन प्लास्टीक डबकीत १० लिटर मोहाफुलाची गावठी दारू किंमती अंदाजे १,५००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीविरूध्द कलम ६५(ई) म.दा.का, अन्वये गुन्हा दाखल करून, कारवाई करण्यात आली.
६) शांतीनगर पोलीसांनी पोलीस ठाणे हद्दीत चंद्रशेखर वाघमारे यांचे घरा समोर, सार्वजनीक रोडवर रेड कारवाई केली असता आरोपी क. १) अरविंद तुकाराम बोरकर, वय ५५ वर्ष २) सिध्दार्थ शिवल पाटील वय ४७ वर्ष ३) ज्ञानकुमार प्रेमदास पाटील वय ४२ वर्ष ४) रूपेश नानेश्वर सोनटक्के वय ३३ वर्ष ५) सुरज फकीरा मेश्राम वय ३४ वर्ष ६) संघपाल विजय पाटील वय ३१ वर्ष ७) अमोल दामोदर काळे वय ३७ वर्ष सर्वे रा. शांतीनगर, नागपुर हे ताश पत्त्यावर पैश्याची बाजी लावुन हार जितचा जुगार खेळतांना मिळुन आल्याने त्यांचे जवळुन, ताश पत्ते, डावावरून व अंगझडतीत एकुण ६३०/- रू. मिळुन आल्याने ते जप्त करून आरोपीविरूध्द कलम १२ म.जु. का अन्वये गुन्हा दाखल करून, कारवाई करण्यात आली.