लोकल मिलिटरी ॲथॅारीटी यांचे सहकार्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांचे मतदान वाढीसाठी आव्हान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी पंचायत समिति अंतर्गत रामक्रीष्ण शारदा मिशन ॲाफ होम सायन्स विद्यालय,कामठी येथे मतदान वाढीसाठी मतदान नृत्य,मतदानाच्या लग्नाचे निमंत्रण, पथनाट्य,गीतगायन, प्रतिज्ञा व संकल्प पत्र विशेष अभियान राबविण्यात आले.

आज एप्रिल२०२४ ला स्वीप अंतर्गत पंचायत समिती कामठी अंतर्गत होम सायन्स विद्यालय कॅन्टोनमेंट क्षेत्र येथे मागील निवडणुकीत या क्षेत्रात १०% मतदान झाल्याने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पथनाट्याचे सादरीकरण केले.तसेच शिक्षकाचे “स्वरचित”मतदानावर आधारीत गीतगायन केले.ईयत्ता ७ वीचे लघुनाट्य प्रेरणादायी होते.३०० विद्यार्थी,५० शिक्षक तसेच कॅन्टोनमेंट क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पालकांकडुन रोजच आपले लाड पुरविणारे विद्यार्थी आता संकल्प पत्राद्वारे मतदान करण्याचे आव्हान करणार आहेत.

सौम्या शर्मा,जिल्हा नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.नागपुर,गटविकास अधिकारी प्रदिप गायगोले, संगिता तभाने,गटशिक्षणाधिकारी तथासहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ,रवि नन्होरे,अतुल आदे यांच्या सहकार्याने हे उपक्रम घेण्यात आले.यामध्ये शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग होता.यावेळी सर्व पालकांना मतदान करण्यास लावु असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.या उपक्रमात लोकल मिलिटरी अॅथॅारीटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कुख्यात गुंड स्थानबध्द

Tue Apr 16 , 2024
नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक १५.०४.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे इमामवाडा, नागपूर ये ह‌द्दीत शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे मयुर वल्द सुरेश फुले, वय २७ वर्षे, रा. रामबाग, मिलींद बौध्द विहारजवळ, पोलीस ठाणे इमामवाडा, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळु तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com