महादाननायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या तृतीय स्मूर्ती दिनानिमित्त महापरित्राण पाठचे आयोजन..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत होणार पुण्यमोदन व धम्मदेसना

कामठी ता प्र 1: स्मूर्तीशेष महादान नायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या तृतीय स्मूर्तीदिनानिमित्त 2 सप्टेंबर 2022 ला सकाळी 9 वाजता विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे प्रमुख भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्रान पाठचे आयोजन करण्यात आले आहे.

उल्लेखनीय आहे की जपान येथील महाउपासिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या धम्मदानातून कामठी शहरात विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारण्यात आले.ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे शांती , मैत्री व मानव कल्याणकारी विचाराचे केंद्र म्हणून जगप्रसिद्ध आहे.तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे जपान येथील मॅडम नोरिको ओगावा व भारतातील ऍड सुलेखाताई कुंभारे यांच्या जपान भारत मैत्रीचे प्रतीक म्हणून सुद्धा ओळखल्या जात आहे.नागपूर येथील पवित्र दीक्षाभूमी सोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे बौद्ध टुरिस्ट सर्किट मध्ये समाविष्ट करण्यात आल्यामुळे ही फार मोठी उपलब्धी असल्याचे मत ओगावा सोसायटीचे अध्यक्ष ऍड सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केले.2 सप्टेंबर 2019 रोजी जपान येथे मॅडम नोरिको ओगावा यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले त्याप्रसंगी ऍड सुलेखा कुंभारे , नोरिको ओगावा यांच्या अंत्यविधी कार्यक्रमात जपान येथे प्रामुख्याने उपस्थित होते.यानुसार 2 सप्टेंबर 2022 रोजी मॅडम नोरिको ओगावा यांच्या तृतीय समुर्ती दिनानिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूज्य भिक्षु संघाच्या उपस्थितीत महापरित्रण पाठ तथा पुण्यानुमोदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला खैरी बुद्धभूमी महाविहाराचे प्रमुख भदंत सत्यशील महाथेरो,पूज्य भदंत महापंत महास्थाविर,चंद्रपूर येथील पूज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो,म्यानमार येथोल पुज्यनिय भन्ते जटिला महाथेरो,अरुणाचल प्रदेश येथील पूज्य भन्ते वननास्वामो महाथेरो,दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य भन्ते नागदीपंकर स्थविर, पूज्य भदंत बोधानंद,पूज्य भदंत ज्ञानबोधी महास्थविर,पूज्य भदंत ज्ञानबोधी स्थविर,पूज्य भदंत सिल्वन्स स्थविर,पूज्य भदंत कविविदा स्थविर,पूज्य भदंत मेत्तानंद,पूज्य भदंत प्रज्ञाज्योती थेरो,पूज्य भदंत सुगसता,पूज्य भदंत अगधम्मा, पूज्य भदंत ,पूज्य भदंत नंदिता व पूज्य भिक्षुगण उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ऍड सुलेखा  कुंभारे यांच्या हस्ते उपस्थित पूज्यनिय भिक्षु संघाला चिवरदान व भोजनदान देण्यात येईल.या पुण्यानुमोदन कार्यक्रमाला उपस्थित राहून महापरित धम्मदेसनेचा लाभ घेऊन कुशलकामात पुण्य संचित करण्याची विनंती ऍड सुलेखा  कुंभारे यांनी केली आहे.

वरील कार्यक्रमाचे आयोजन ओगावा सोसायटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था,दादासाहेब कुंभारे बहुऊदेशीय प्रशिक्षण संस्था,ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,ओगावा इंटरप्रायझेस प्रा ली द्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अवैध रेती वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात 42 चेक पोस्ट उभारणार : #जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर

Thu Sep 1 , 2022
नागपूर दि. १ : अवैध रेती वाहतुकीतून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या असामाजिक तत्त्वांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील 42 संभाव्य ठिकाणी सीसीटीव्ही निगराणीचे 42 चेक पोस्ट उभारले जाणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी आज जिल्ह्यातील पोलिस, महसूल व गौण खनिज विभागाची बैठक घेऊन हे निर्देश दिले.जिल्ह्यातील नैसर्गिक जलसाठ्यांना तसेच गौण खनिजाला हाणी पोहोचविणाऱ्या प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी महसूल ,पोलीस, गौण खनिज विभाग […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com