धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांना हिंदू महासभेतर्फे अभिवादन

नागपूर :- धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या जयंतीचा कार्यक्रम हिंदू महासभेच्या, टिळक रोड, महाल येथील कार्यालयात दि. 12/12/2022 रोजी साजरा करण्यात आला. यावेळी हिंदू महासभेचे ज्येष्ठ नेते व स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे विश्‍वस्त व माजी अध्यक्ष अरूण जोशी यांनी डॉ. बा. शि. मुंजे यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी अरूण जोशी म्हणाले, “आज देशाला धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांच्या विचारांची गरज आहे. त्यांची देशहितकारक विशुद्ध राजनीती होती. स्वातंत्र्य लढ्यातील जहाल विचारसरणीचे ते समर्थक होते. त्यांनी आयुष्यात हिंदू पुनरूत्थानाकरिता प्रयत्न केले. त्यांचे ध्येय हिंदू राष्ट्र रक्षणाचे होते. त्याच्या विचारांचा सातत्याने प्रचार व प्रसार करण्याची नितांत आवश्यकता आहे. देश बलवान करायचा असेल तर तरूणांनी सैनिकी शिक्षण घ्यावे तसेच धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांची देशभक्ती प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा.’’ ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास डॉ. बाबूलाल धोत्रे, डॉ. दत्तात्रय करांगळे, डॉ. जयदीप घोष, शंकरराव वैद्य, अनंत पाध्ये, कैलास शेजोळे, जितेंद्र कलोडे तसेच हिंदू महासभेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लकडगंज झोन अंतर्गत १२४ भुखंड जप्त - थकीत मालमत्ता कर वसुली मोहीम

Thu Dec 15 , 2022
नागपूर  : नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन अंतर्गत थकीत मालमत्ता कर वसुली मोहिमेअंतर्गत खुल्या भुखंडांवर जप्ती/वारंट कार्यवाही करण्यात आली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार लकडगंज झोन अंतर्गत एकूण १२४ भुखंड व मालमत्ता कर रक्कम रूपये ३६,३६,०९४ रूपये थकीत कर वसुली करिता जप्ती कारवाई करण्यात आली. बुधवार (ता. १४) रोजी करण्यात आलेली कार्यवाही लकडगंज झोनचे सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांच्या मार्गदर्शनात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com