कृषि विद्यापीठातील पदोन्नतीचा विषय लवकरच मार्गी लावणार – कृषिमंत्री दादाजी भुसे

   मुंबई : राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर पदाच्या रिक्त जागा भरण्याबाबत कृषि विभाग कार्यवाही करत आहे. सध्या आवश्यकता तपासून तासिका आणि मानधन तत्वावर पदे भरण्याच्या सूचना कृषि विद्यापीठांना केल्या असून पदोन्नतीचा विषयही लवकर मार्गी लावण्यात येईलअशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

            विधानपरिषदेत सदस्य सतिश चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे कृषि विद्यापीठातील रिक्त पदांचा प्रश्न मांडला होता.

            कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणालेराज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीडॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि डॉ.बाळासाहेब सावंत कृषि विद्यापीठदापोली या चारही विद्यापीठात शिक्षक आणि शिक्षकेतरांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सध्या त्या पदांचा अतिरिक्त कार्यभार देऊन कामकाज करण्यात येत आहे. याशिवायपदोन्नतीची प्रक्रियाही गतीने राबविण्याच्या सूचना देण्यात  आलेल्या आहेत. रिक्त जागांची पदभरती करण्यासंदर्भातील प्रस्ताव  नियमाप्रमाणे तयार करुन त्याची कार्यवाही केली जाईलया दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाहीयासाठी आवश्यक कार्यवाहीच्या सूचना कृषि विद्यापीठांना देण्यात  येणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

            या लक्षवेधीवरील चर्चेत श्री. चव्हाण यांच्यासह सदस्य शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धेत ३० डिसेंबरपर्यंत घ्या सहभाग

Wed Dec 29 , 2021
चंद्रपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी चॅलेंज स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात झिरो डम्प, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट, ट्रान्स्परन्सी (डिजिटल इनाब्लेमेन्ट ) आदी विषय यात आहेत. येत्या ३० डिसेंबर रोजीपर्यंत या स्पर्धेत सहभागी होता येईल.   चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा संकलन व्यवस्थापन, विलगीकरण व पुनर्वापर यावर राणी हिराई सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com