कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे रजतमहोत्सवानिमित्त त्रिदिवसीय कीर्तन महोत्सवाचे रामटेकवासियांच्या साक्षीने उत्साहात उद्घाटन संपन्न….

रामटेक – कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातर्फे रजतमहोत्सवानिमित्त त्रिदिवसीय कीर्तन महोत्सवाचे रामटेकवासियांच्या साक्षीने उत्साहात उद्घाटन संपन्न होत कार्यक्रमाला सुरुवात झाली.कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतीय दर्शन विभागाच्या वतीने विश्वविद्यालय रजतमहोत्सवाचे औचित्य साधून त्रिदिवसीय कीर्तनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे . या कीर्तनमहोत्सवाचे उद्घाटन  विश्वविद्यालयाच्या चंद्रशालेच्या प्रांगणात  संपन्न झाले . या कीर्तनमहोत्सव उद्घाटन समारोहाच्या अध्यक्षस्थानी  कुलगुरू प्रो . मधुसूदन पेन्ना होते . उद्घाटक या नात्याने विश्वविद्यालयाचे संस्थापक पूर्वकुलगुरू सन्माननीय डॉ . पंकज चांदे उपस्थित होते . रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार  कृपाल तुमाने , पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे हे विशेषत्वाने उपस्थित होते . कुलसचिव डॉ . रामचंद्र जोशी , रामटेक परिसर संचालक प्रो . कविता होले , प्रो . कृष्णकुमार पाण्डेय , समन्वयक , ह.भ.प.  चाफळे महाराज , रजतमहोत्सव समिती आणि भारतीय दर्शन विभाग प्रमुख प्रो . कलापिनी अगस्ती व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते
कीर्तनाची सांगता आरतीने झाली . कार्यक्रमाचे संचालन  सुमीत कठाळे , सहायक कुलसचिव , महाविद्यालयीन विभाग आणि प्रा . श्रद्धा उपाध्ये यांनी केले . रामटेकवासीयांनी या कीर्तनमहोत्सवाला मोठया संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला . रामटेकमधील अनेक मान्यवर , पत्रकार , नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नगराध्यक्षाच्या घरी जाऊन चाकु दाखवुन मुलीना शिविगाळ करित आईला पाहुन घ्यायची धमकी

Sat Mar 12 , 2022
 कन्हान पोलीस स्टेशन चा घेराव करून असा माजिक तत्वास आळा घालण्याची मागणी.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस दोन कि मी अंतरावर असलेल्या नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर यांच्या घरी जाऊन त्याच्या दोन मुलीला एका आरोपीने चाकु दाखवुन शिवीगाळ देत तुझ्या आईला पाहुण घेईन अशी धमकी दिल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला करूणाताई आष्टणकर यांच्या लेखी तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com