सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या ७२ प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (ता.६) रोजी उपद्रव शोध पथकाने ७२ प्रकरणांची नोंद करून ४२ हजार ३०० रुपयाचा दंड वसूल केला.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. ४००/- दंड) या अंतर्गत ३४ प्रकरणांची नोंद करून १३,६०० रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०१ प्रकरणांची नोंद करून १०० रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे याअंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ८०० रुपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ६००० रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०५ प्रकरणांची नोंद करून ६००० रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा इत्यादी ठिकाणी बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे प्रथम या अंतर्गत ०३ प्रकरणाची नोंद करून ७००० रुपयांची वसुली करण्यात आली.

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव (व्यक्ती) असल्यास १९ प्रकरणांची नोंद करून रु ३८०० दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०५ प्रकरणांची नोंद करून रु ५००० दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

*प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यां ०५ प्रकरणाची नोंद*

मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या ०५ प्रकरणांची नोंद करून २५ हजार रुपयाचा दंड वसूल केला. यात प्रतिबंधक प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या मे. डोंगरे किराणा& जनरल स्टोर्स कॉटन मार्केट, मे. दुर्गेश स्वीट मार्ट, क्वेटा कॉलोनी, मे. नामदेव किराणा शॉप, बुधवारी, इतवारी मार्केट, श्री प्राग कोनेकर, देव नगर, पेशवा कोचिंग क्लासेस मनिष नगर यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CPSWN Digital Designers corner glory at National Design Championship 2023

Wed Feb 7 , 2024
Nagpur :- Grabbing the golden opportunity to showcase their creative designing skills in the digital arena, Centre Pointers at Wardhaman Nagar put their best designer foot forward when they participated in the National Design Championship 2023 which gives school students the biggest platform to exhibit their talent, creativity and skills in App Design, Game Design, Coding, Graphics Design, 3D Design […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com