मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश ओबीसी मोर्चाच्या प्रमुखपदी संजय गाते, अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी दिलीप कांबळे तर किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी गणेश भेगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पक्षाच्या सर्व प्रदेश मोर्चे, आघाड्या प्रमुखांची घोषणा करण्यात आली असून परराष्ट्र संबंध विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, विधानसभा विस्तारक योजना यांच्या प्रदेश संयोजकांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत.
अन्य मोर्चा, आघाड्यांच्या अध्यक्षांची नावे पुढील प्रमाणेः
1. संजय गाते (वर्धा)
प्रदेश अध्यक्ष, ओबीसी मोर्चा
2.उत्तमराव इंगळे(यवतमाळ)
प्रदेश अध्यक्ष, अनुसूचित जमाती मोर्चा
3.दिलीप कांबळे (पुणे)
प्रदेश अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा
4.गणेश भेगडे (पुणे)
प्रदेश अध्यक्ष, किसान मोर्चा
5.मो.इद्रीस मुलतानी (छ.संभाजीनगर)
प्रदेश अध्यक्ष, अल्पसंख्याक मोर्चा
6.विजय हरगुडे (पुणे)
प्रदेश अध्यक्ष, कामगार आघाडी
7.राहुल केंद्रे (लातूर)
प्रदेश अध्यक्ष, भटके विमुक्त आघाडी
8.गौरव पटवर्धन (नागपूर)
प्रदेश संयोजक, परराष्ट्र संबंध विभाग
9.सुनिल कर्जतकर(मुंबई)
प्रदेश संयोजक, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
10.कृपाशंकर सिंह (मुंबई)
प्रदेश संयोजक, विधानसभा विस्तारक योजना
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.