संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नवीन अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीच्या श्लोकांचा समावेश करू नये अशी मागणी कांग्रेस पदाधिकारी व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.
शाळेमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयाच्या अध्यापनात मनाचे श्लोक आणि भगवद् गीतेचा 12 वा अध्याय पाठ करावा लागणार आहे.राज्य शैक्षणिक संशोधन आणि परिषदेने जाहीर केलेल्या अभ्यासक्रम आराखड्यात याबाबत सूचना केली आहे. देशात मनुस्मूर्ती या पुस्तकावर बंदी असताना विद्यार्थ्यांच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यात मनुस्मूर्तीचा समावेश कसा करण्यात येत आहे असा प्रश्नदेखील राज्य सरकारला विचारण्यात येत आहे.म्हणून नवीन अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीचा समावेश करू नये तसे झाल्यास जनभावना दुखावतील व त्याचे तीव्र पडसाद उमटतील त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या नविन अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीच्या श्लोकांचा समावेश करू नये अशी मागणी कांग्रेस चे पदाधिकारी व नागपूर जिल्हा परिषदचे माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांनी केली आहे.