मुंबई :- प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी ध्वजवंदन आणि भारतमाता पूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रसाद ओक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित, आमदार श्रीकांत भारतीय, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.