स्टारबसच्या धडकेत वडील ठार, मुलगा जखमी

नागपूर :-वडीलांना घेऊन दुचाकीने घरी परतत असताना मागून येणा-या भरधावर स्टार बसने दुचाकीला कट मारली. या अपघातात वडील बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मूलगा जखमी झाला. दिनकर बाबुराव राऊत, (६५) असे मृतकाचे तर श्रीरंग दिनकर राऊत (२२) असे जखमी मुलाचे नाव आहे. क्रीडा चौक ते आवाराी चौका दरम्यान ही घटना घडली.

रा. प्लॉट नंबर ५३९, जुनी शुक्रवारी कोतवाली येथे राहणारे श्रीरंग आणि दिनकर हे दोघे ४ आॅगस्ट रोजी, दुपारी २.३० वाजताच्या सुमारास दुचाकी (एम.एच.बी.एफ.०८१८) ने हॉस्पिटलमधून घरी परतत होते. यावेळी, श्रीरंग दुचाकी चालवत होता. ते ईमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत न्यू मारोती चिकन सेंटर, क्रीडा चौक ते आवारी चौक दरम्यान पोहोचले असता स्टार बस (एमएच ४० बी.जी. १०८४) चा चालक गुणेश्वर शिवाजी सहारे (४९, रा. पंचशीलनगर, राणी दुर्गावती चौक) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने तसेच निष्काळजीपणाने चालवत श्रीरंगच्या दुचाकीला कट मारली. यामुळे, त्याचे दुचाकीवर मागे बसलेले वडील आणि तो खाली पडले असता वडील हे बसच्या मागच्या चाकात सापडले. त्यांना उपचाराकरिता मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरूद्ध कलम १०६(१), २८१, १२५(अ) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करत बस चालकाला अटक केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ.नरेंद्र भुसारी प्रेरक व्यक्तिमत्व - प्रफुल्ल पारख

Tue Aug 6 , 2024
नागपुर :- डॉ. नरेंद्र भुसारी प्रेरक व्यक्तिमत्व हैं। उन्होंने अनेक विद्यार्थियों का निर्माण किया हैं यह प्रशंसोदगार भारतीय जैन संगठना पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख व्यक्त किए। रविवार को डॉ. नरेंद्र भुसारी मित्र परिवार द्वारा श्री सैतवाल जैन संगठन मंडल महावीरनगर नागपुर के सभागृह में नरेंद्र भुसारी अभिनंदन सम्मान समारोह का आयोजन किया गया था। समारोह की अध्यक्षता पूर्व निवासी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!