नागपूर :-फिर्यादी उमरावसिंग सुरेशसिंग बैस वय ६४ वर्ष रा. शिवाजी वार्ड कं. २, मौदा, जि. नागपूर यांचे मुलगी व जवाई है पोलीस ठाणे कपिलनगर हद्दीत रो हाऊस क. २९, सुमन विहार, कामठी रोड, नागपूर येथे राहत असुन ते दिनांक २८.०७.२०२४ से १७.०० वा. ते दि. ०६.०८.२०२४ चे १३.३० वा. चे दरम्यान, आपले राहते घराला कुलूप लावून परिवारासह कलकत्ता येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे मुलीचे घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून घरातील आलमारीतुन रोख १,००,०००/- रू. व सोन्याचे दागिने असा एकुण किंमती अंदाजे २,१६,०००/- रू. या मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे कपिलनगर येथे पोहवा, भोवते यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.