डिजिटल मीडिया संघटने तर्फे चिंधीचकच्या वर्षा लांजेवार यांना महागौरव पुरस्कार

नागपूर :- डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचा राज्यस्तरीय महागौरव पुरस्कार विदर्भ विभागातून यावर्षी प्रयोगशील शेतकरी वर्षा तुळशीदास लांजेवार यांना जाहीर झाला आहे. राज्याच्या 8 विभागांमधून एकूण 14 समाजसेवकांना हा पुरस्कार दिला जाईल. कोल्हापूरच्या कन्हेरी मठात 29 जानेवारीला होणाऱ्या द्वितीय वार्षिक अधिवेशनात हे पुरस्कार वितरण होईल. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, विदर्भ विभागीय अध्यक्ष विनोद देशमुख, विभागीय कार्याध्यक्ष नरेन्द्र वैरागडे, राज्य संघटक सुरेश वांदिले, सविता कुळकर्णी आदी पदाधिकाऱ्यांनी वर्षाताईंची एकमताने निवड केली.

चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील चिंधीचक गावच्या वर्षाताई स्वत: शेती करतात आणि इतर महिलांनीही शेतकरी बनावे यासाठी प्रचार, प्रोत्साहन, मार्गदर्शन करीत असतात. शिवाय, उत्पादित शेतमाल स्वत:च विकणे, तांदळाचे नवनवे वाण, सेंद्रिय खते, शेळीपालन, कुक्कुटपालन या उपक्रमांद्वारे शेतीचे महत्त्वही त्या अधोरेखित करीत असतात. “महिला शेतीच्या प्रचारक” अशी त्यांची ओळखच निर्माण झाली आहे.

NewsToday24x7

Next Post

रुफ़टॉपसाठी महावितरणची जनजागृती

Fri Jan 26 , 2024
नागपूर :- नागपूरला सौर जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी महावितरणने पुढाकार घेत ठिकठिकाणी जनजागृती कार्यक्रम हाती घेतले आहेत. महावितरणच्या नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनीगुरुवरी खापा येथील राजेंद्र हायस्कूल आणि बडेगाव शाखा कार्यलायांतर्गत असलेल्या कोच्ची गावातील अभ्युदय विद्यालय येथील विद्यार्थी,, शिक्षक आणि पालकांना सौर रुफ़ टॉप योजनेची विस्तृत माहिती देत या योजनेचे फ़ायदे समजावून सांगितले. याशिवाय, गोंडेगाव ग्रामपंचायत कार्यालय, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com