संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी शहर व ग्रामीण भागातील विविध गावात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत बाबासाहेब कृषी उत्पन्न मार्केट यार्ड शुक्रवारी बाजार परिसरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . नागपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे हस्ते बैलजोडीची पूजा आरती व शेतकऱ्यांचा सत्कार करून पोळा उत्सव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सभापती अनिकेत शहाणे,उपसभापती इटकेलवार,माजी नगराध्यक्ष माया चौरे, नगरपरिषद माजी अध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर, माजी उपाध्यक्ष अजय कदम ,माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान ,बरीएम शहर अध्यक्ष दिपंकर गणवीर,माजी नगरसेवक लालसिंग यादव ,प्रतीक पडोळे, मूलचंद सीरिया, बनवारीलाल यादव ,किशोर गेडाम, तिलक गजभिये, नरेंद्र शर्मा,शेषराव ढबाले,राजेश गजभिये, गीतेश सुखदेवे, विकास रंगारी, प्रमोद खोब्रागडे , कोमल लेंढारे,राजन मेश्राम सह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सचिव विकास बोबडे यांनी केले तसेच कामठी तालुक्यातील खैरी येथे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान यांचे हस्ते बैलजोडीची पूजा आरती करून शेतकऱ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.