होळी / धुळवड आणि ग्रामशुध्दी दिन साजरा करावा असा महारांजांचा आग्रह

– होळी व धुळवड ग्राम शुध्दी दिन साजरा करा – वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !

– ग्रामशुध्दी दिन साजरा करावा असा महारांजांचा आग्रह .

नागपूर :- भारतीय समाजामध्ये सणांचे अत्यंत महत्व आहे त्यापैकी होळी उत्सव. संपुर्ण महाराष्ट्रातील होळी हा सण मोठ्या उत्साहने साजरा केला जातो. पारंपारीक होळी या सण्याच्या निमित्याने विकृत वागणे गलिच्छ शिवीगाळ करुन चिखलफेक करणे अश्या स्वरुपाचे विकृत आले होते. वं. राष्टसंत तुकडोजी महाराजांनी होळी सणाचे परंपारीक व पर्यावरण महत्व लक्षात घेवुन समाजातील अनिष्ठ परंपरा पसरलेली विकृती नष्ट व्हावी या करिता परिसरात ग्राम स्वच्छता करुन सांस्कृतिक प्रबोधन कार्याकमाचे सार्वजनिक आयोजन करुन परिसरात रामधुन काढण्यात यावी. रामधुन मध्ये स्वच्छ पोषाख परिधान करुन नामस्मरण करित भजने गावुन रामधून काढावी तसेच रामधुनच्या मार्गावर महापुरुषांचे किंवा आपल्या ईष्ट देवतांचे फोटो लावुन त्यांच्या विचारांचा जयजकार करण्यात यावा. अत्यंत शिस्तमध्ये रामधुनचे संचलन करण्यात यावे हा निर्मल उद्वेष घेवुन ग्रामशुध्दी दिन साजरा करावा असा महारांजांचा आग्रह होता. श्री गृरुदेव सेवा मंडल नागपूरच्या वतीने तुकडोजी महाराजांनी घालुन दिलेल्या परिपाठानुसार सेवाश्रम परिसरात स्वच्छता करुन होळीच्या निमित्याने रामधुन काठण्यात येते गणेशपेठ, शनिवारी, गुजरवाडी या नजिकच्या परिसरात रामधुनचे संचलन करण्यात येते रामधुनमधे स्वच्छ पोषाक परिघान करुन असंख्य भाविक रामधुन मध्ये सहभागी होतात. परिसरातील नागरिक रामधुनचे स्वागत करतात. अनोख्या पध्दतीने श्रीगृरुदेव सेवा मंडल ग्राम शुध्दीदिन साजरा केल्या जाते. यावर्षीही सोमवारी 25 मार्च रोजी, होळी निमित्ताने परिसरात स्वच्छता अभियान राबवुन रामधुनचे आयोजन करुन ग्राम शुध्दी दिन साजरा करण्यात येत आहे. कार्यक्रमाचा समारोप प्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर यांच्या काव्य महफिलने होणार आहे. या कार्यक्रमात गृरुदेव भक्त व जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थीत रहावे. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रोटेक्शन ॲक्ट महाराष्ट्रसह संपुर्ण देशात लागू करण्याची मागणी - ॲड. छत्रपती शर्मा

Sat Mar 23 , 2024
नागपूर :- वकिलांच्या सुरक्षिततेसाठी असा कोणताही कायदा सरकारने तयार केला नाही. वकीलांवर होणाऱ्या हल्ल्या संबंधित हल्ले होत असल्यामुळे त्यावर अंकुश घालण्यासाठी ऍक्ट प्रोटेक्शनची नितांत आवश्यकता आहे. यातील ॲक्ट मध्ये वकिलांना राजकीय आर्थिक सामाजिक आणि व्यक्तिगत सुरक्षा मिळावी हेच अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या 29 मार्च 2024 रोजी विदर्भ स्तरीय संमेलन वकिलांच्या द्वारे आमदार निवास सिविल लाईन नागपूर येथे विविध विषयांवर चर्चासत्राचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com