वाघोली येथे घराच्या दाराचे कुलुप तोडुन घरफोडी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

सोने, चांदीच्या दागिने सह नगदी ४ हजार रू असाएकुण १६,७०० रुपयाच्या मुद्देमालाची चोरी.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १० कि मी अंतरावर वाघोली येथे अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधुन दाराचे कुलुप तोडुन आलमारी तील सोने, चांदीच्या दागिन्यासह नगदी ४ हजार रू. असा एकुण १६,७०० रूपयाचा मुद्देमाल चोरी करून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याने कन्हान पोलीसां नी फिर्यादी च्या तक्रारीने अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करीत आरोपीचा शोध घेत आहे .
प्राप्त माहिती नुसार वाघोली येथील भिमराव धनराज काकडे वय ५२ वर्षे हे बाहेर गावी गेले असतां ना (दि.३१) मे २०२२ चे सकाळी ७:३० वाजता ते १ जुन चे सकाळी ७ वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घरी कुणी नसल्याची संधी साधुन घराच्या दाराचे कूलुप तोडून आत प्रवेश करित आलमारीचे लॉक तोडुन लाॅकर मध्ये ठेवलेले ४ ग्रँम सोन्याचे टॉप्स किंमत १०,००० रूपये, कमरपट्टा चांदीचा ४ तोळे किंमत १२०० रूपये, चांदीचे पायपट्या ५ तो़ळे किंमत १५०० रूपये व नगदी ४००० रूपये असा एकुण १६,७०० रूपयाचा मुद्देमाल माल चोरून घरफोडी केल्याने कन्हान पोलीस स्टेशनला फिर्यादी भीमराव काकडे यांच्या तोंडी तक्रारी वरून व पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या आदेशाने अप क्र ३३०/२०२२ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार श्रावणकर हे पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पारशिवनी तालुका शोध व बचाव पथकास एनडी आर एफ व एसडीआरएफ व्दारे रंगीत तालीम

Thu Jun 2 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी पारशिवनी : – पावसाळ्यात पुर परिस्थिती निर्माण होऊन जीव धोक्यात आलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याच्या दृष्टीकोणातुन पारशिवनी तहसिल कार्यालयाच्या तालुका शोय व बचाव पथकास आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरएफ व एसडीआरएफ व्दारे आज सोमवार ला नवेगाव (खैरी) येथील पेंच धरणा च्या जलाशयात आपत्ती व्यवस्थापन ची कार्यशाळेचे आयोजन करून प्रशिक्षण देऊन रंगीत तालीम घेण्यात आली. पावसाळा पेंच प्रकल्प […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com