संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- येथील स्थानिक, नागपुर जिल्हयात शिवसेनेचे पायमुळ घट करणारे सर्वसामान्याना न्याय मिळवुन देण्याकरिता अनेक आंदोलने करून जनमानसात शिवसेना पोहचविणारे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष पद भुषविणारे, तेविस महिने रामटेक लोकसभेचे सदस्य राहुन पक्षाने दिलेली सर्व जवाबदारी निष्ठेने पार पाडणारे, रामटेकचा खुंटलेला विकास करण्याकरिता कर्तव्यदक्ष आणि रामटेक विधानसभेची संवेदना असलेले एकमेव प्रकाश जाधव यांनाच शिवसेना (उबाठा) पक्षाची उमेदवारी बहाल करावी. अशी निष्ठावान शिवसैनिक तसेच महाविकास आघाडी मित्र पक्षा च्या कार्यकर्त्यात जोमाने चर्चा रंगु लागल्या आहे.
लोकसभेची निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी ने चांगलेच यश संपादन करित सताधारी पक्षा च्या महायुतीला चांगलेच पाणी पाजले. महाविकास आघाडीतल्या रामटेक लोकसभेच्या काँगेस उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्या विजयामध्ये शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचा सिंहाचा वाटा असुन प्रकाश जाधव हयांनी अनेक प्रचार सभा घेत सत्ताधारी महायुतीचा चांगलाच समाचार घेऊन मतदार संघ पिंजुन काढल्याने महाविकास आघाडीचा रामटेक मध्ये चांगल्या मतानी विजय झाला आहे. गणेशोत्सव संपताच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले असुन सर्वाच राजकीय पक्षातील उमेदवार दावा सादर करित असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील रामटेक विधान सभेतील कन्हान, टेकाडी, गोंडेगाव, माहुली, पारशिवनी, करंभाड, नवेगाव, मनस र, पथरई-वडंबा, बोथिया-पालोरा-उमरी, रामटेक, नगरधन-भंडारबोडी, कांद्री-सोनघाट, अरोली-कोंदामें ढी, खात-रेवराल, चाचेर-निमखेडा, तारसा- बापदेव या संपुर्ण जि प सर्कल अंतर्गत २१२ गावे व कन्हान, रामटेक या दोन नगरपरिषद आणि पारशिवनी नगर पंचायत मधिल ३३ प्रभाग असे रामटेक विधान सभेतील ३५७ बुथातील जुने, नविन निष्ठावान शिवसैनिकांनी ” निष्ठेला निवडा, खद्दारीला गाढा ” चा आवाज बुलंद करण्यास आग्रही मागणीस्तव रामटेक माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांनी पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब यांचाकडे रामटेक विधानसभेची उमेदवारीची मागणी केल्याने रामटेक विधानसभेत शिवसेना (उबा ठा) पक्षाच्या शिवसैनिकात नवचैतन्य निर्माण होऊन अहोरात्र मेहनत करून चारदा शिवसैनिकांनी रामटेक चे आमदार केलेल्या आशिष जैस्वालाना त्यांची खरी जागा दाखविण्याकरिता पक्षप्रमुख व कुंटब प्रमुख उध्दव ठाकरे यांनी रामटेकचा खुंटलेला विकास करण्याकरिता शिवसेना विदर्भाची मैदानी तोफ, रामटेक क्षेत्राची सवंदेना असलेले कर्तव्यदक्ष, निष्ठावान प्रकाश जाधव याना महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या मशाल चिन्हावर एकमेव उमेदवारी बहाल करण्याची निष्ठावान शिवसैनिक आतुरतेने वाट बघत आहे.