मागेल त्याला सौर कृषी पंप, महावितरणच्या वेबसाईटला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद

मुंबई :- मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरु केलेल्या महावितरणच्या वेबसाईटला उदंड प्रतिसाद मिळाला असून केवळ चौदा दिवसात १ लाख २२ हजार शेतकऱ्यांनी त्यावर नोंदणी केली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

राज्य सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठी महावितरणने वेबसाईट तयार केली असून तिचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. १३ सप्टेंबर रोजी मुंबईत समारंभपूर्वक झाले होते. त्यानंतर केवळ १४ दिवसात दि. २७ सप्टेंबरपर्यंत राज्यातील १,२२,४२१ शेतकऱ्यांनी वेबसाईटवर अर्ज दाखल केले होते.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यामध्ये जालना जिल्ह्याने बाजी मारली आहे. जालना जिल्ह्यातून ५२,०६७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर राज्यात मराठवाड्यातील बीड (२४,५२६ अर्ज), परभणी (१५,०४३ अर्ज), छत्रपती संभाजीनगर (६,८८८ अर्ज) आणि हिंगोली (५,०७९ अर्ज) या जिल्ह्यांचा क्रम लागतो.

या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना ऊर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात मिळते. सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते. शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाही तसेच त्याला बिलही येत नाही. सिंचनासाठी केवळ दिवसा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या वेबसाईटवर नोंदणी करा

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज दाखल करावा. वेबसाईटवर योजनेविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकरी वीज ग्राहकांचे शंका समाधान करण्यासाठी सविस्तर प्रश्नोत्तरेही आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पुढील प्रगतीची माहितीही वेबसाईटवर तपासता येते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विदर्भातील 5,077 ग्राहकांना महावितरणचे अभय

Sat Sep 28 , 2024
नागपूर :- थकित बिलामुळे वीज पुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने जाहीर केलेल्या अभय योजनेचा विदर्भात पहिल्या 27 दिवसांत 6,490 ग्राहकांनी या योजनेत सहभागी होण्याची इच्छा दर्शविली असून त्यापैकी 5,077 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला. थकबाकीतून मुक्त होण्याची सुवर्णसंधी असल्याने अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या नागपुर प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी केले आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/11/WhatsApp-Video-2024-11-13-at-13.36.19_a6cf01ac.mp4 संपूर्ण विदर्भाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com