नागपूर :-फिर्यादी अभिषेक संजय गेडाम वय ३० वर्ष, रा. प्लॉट नं. ६४४, इंदोरा बौक, कामठी रोड, जरीपटका, नागपूर पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीत राम कुलर चौक, नागपूर येथे राम कुलरचे शोरूम मध्ये मॅनेजर पदावर काम करतात, दिनांक ०६.०५.२०२४ से १२.०० वा. ते दि. २६.०९.२०२४ चे १६.०० वा. चे दरम्यान आरोपी क. १) विकास सदाशिव वरठी वय ४० वर्ष रा. सिध्दी विनायक ट्रेडर्स, मोतीलाल नगर, उमरेड रोड, नागपुर २) विनोद कांनळी वर्ष ३८ वर्ष रा. लकडगंज, नागपूर यांनी फिर्यादीचे दुकानात फोन करून २ कूलर किंमती अंदाजे ४४,४००/- रु. चे बुक केले. आरोपी क. १ याने २,०००/- रू. ऑनलाईन फिर्यादीचे मोबाईलवर पाठविले, व उर्वरीत पैश्याचा एच.डी.एफ.सी बँकेचा चेक फिर्यादीस दिला, नमुद चेक फिर्यादीने बँकेत लावला असता सदर चेक बाऊंस झाला. आरोपीतांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीची एकूण ४२,४००/- रू. आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिनांक २६.०९.२०२४ रोजी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गणेशपेठ येथे पोउपनि, भोकरे यांनी आरोपीविरूध्द कलम ३१६ (२), ३१८(४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.