कुख्यात गुंड स्थानबध्द

नागपूर :- शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक २६.०९.२०२४ रोजी जारी केलेल्या आदेशान्वये पोलीस ठाणे जरीपटका व मानकापुर नागपूर ये ह‌द्दीत शरीराविरूध्द व मालमत्तेविरूध्द गुन्हे करणारा कुख्यात गुंड नामे ऋषी उर्फ लक्की वल्द मधुकर शाहु, वय ३० वर्षे, रा. हुडको कॉलनी, रमाई नगर गार्डनजवळ, कपीलनगर, यादव नगर, समता नगर, पोलीस ठाणे जरीपटका, नागपूर शहर यास महाराष्ट्र झोपडप‌ट्टीदादा, हातभ‌ट्टीवाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हीडीयो पायरेटस्, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे संबंधी अधिनियम, १९८१ अंतर्गत दिनांक २६.०९.२०२४ रोजी स्थानबध्द आदेश पारीत केला. त्यास दि. २६.०९.२०२४ रोजी आदेशाची बजावणी करून नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

ऋषी उर्फ लक्की वल्द मधुकर शाहु, याचे विरुध्द पोलीस ठाणे जरीपटका व मानकापुर येथे खुन करण्याचा प्रयत्न करणे, मालत्तेचे नुकसान करणे, प्राणघातक शखासह गैर कायदेशीर जमावात शामील होवुन दंगा करणे, प्राणघातक शस्त्राने आपखुशीने दुखापत करणे, आपखुशीने दुखापत करणे, दुखापत, हमला किंवा गैरनिरोध करण्याची पुर्वतयारी करून नंतर गृह अतिक्रमण करणे, आपराधीक जीवे ठार मारण्याची धमकी देणे, मालमत्तेचे नुकसान करणे, अशिल शिवीगाळ करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे, अवैध्यरित्या दारूची विक्री करणे, चोरी करणे, प्राणघातक शस्त्र जवळ बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे, इत्यादी शरीराविरूध्दचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

सदर स्थानबध्द इसमाविरूध्द पोलीस ठाणे जरिपटका पोलीसांव्दारे सन २०२१ व २०२२ मध्ये कलम ११० (ई) (ग) सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्याचेकडुन चांगल्या वर्तवणुकीकरिता अंतिम बंधपत्र घेण्यात आले होते. परंतु त्याने सदर बंधपत्राचे उल्लंघन करून अलीकडील काळात त्याने पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत खुन करण्याचा प्रयत्न करणे, आपखुशीने दुखापत करणे, आपराधीक जीवे ठार मारण्याची धमकी देणे, अशिल शिवीगाळी करणे, शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक अपमान करणे इत्यादी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत.

अशाप्रकारे धोकादायक व्यक्ती नामे ऋषी उर्फ लक्की वल्द मधुकर शाहु, याची अपराधीक कृत्ये असल्याने आणि त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होत असल्याने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे जरीपटका, नागपूर शहर यांनी नमुद आरोपीतास स्थानबध्द करण्याकरिता गुन्हे शाखेस प्रस्ताव सादर केला होता. गुन्हेशाखेतील एम. पी.डी.ए. विभागाने नमुद आरोपीला स्थानबध्द करण्याकरीता प्रस्ताव सादर केला. त्याअन्वये स्थानबध्द प्राधिकारी पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे समक्ष सादर केले असता त्यांनी वर नमुद स्थानबध्द इसमाविरुध्द स्थानबध्दतेचा आदेश पारित करून त्यास येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे ठेवण्याबाबत आदेश दिलेत. त्याअन्वये वर नमुद इसमाविरूध्द स्थानघध्दतेची महत्वपुर्ण कारवाई करून त्यास सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे ठेवण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वाहन चोरी करणारे आरोपींना अटक, ०२ गुन्हे उघडकीस

Sat Sep 28 , 2024
नागपूर :- फिर्यादी नामे रविन्द्र बलवंतराव धोटे, वय ५० वर्षे, रा. प्लॉट नं. ७६, विठ्ठल नगर, दिघोरी, हुडकेश्वर, नागपुर यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी क. एम. एच. ४० ए.ई ४१२० किंमती २५,०००/- रू. ची पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत, लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह येथील ओपीडीचे पार्किंग मध्ये हॅन्डल लॉक करून व पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com