नागपूर :- फिर्यादी नामे रविन्द्र बलवंतराव धोटे, वय ५० वर्षे, रा. प्लॉट नं. ७६, विठ्ठल नगर, दिघोरी, हुडकेश्वर, नागपुर यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर गाडी क. एम. एच. ४० ए.ई ४१२० किंमती २५,०००/- रू. ची पोलीस ठाणे एम.आय.डी.सी हद्दीत, लता मंगेशकर हॉस्पीटल, डिगडोह येथील ओपीडीचे पार्किंग मध्ये हॅन्डल लॉक करून व पार्क करून ठेवली असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचे तपासात एम.आय.डी.सी पोलीसांना मिळालेले खात्रीशीर माहितीवरून व तांत्रीक तपास करून आरोपी क. १) अर्चित गोविंदराव वंजारी वय २० वर्ष रा. भिमनगर वस्ती, झीरो डिग्री लॉन समोर, नागपूर २) कार्तिक पुरुषोत्तम चौरागडे वय १९ वर्ष रा. आनंद नगर, जयताळ्ळा, नागपूर यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले, त्यांना अधिक विचारपुस केली असता, त्यांनी वर नमुद गुन्ह्याव्यतिरिक्त पो. ठाणे प्रतापनगर हद्दीतुन ०१ वाहन चोरीचा गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपींचे ताब्यातुन गुन्ह्यात चोरी केलेले हिरो होन्डा सलेंडर गाडी क. एम.एच. ४० एई ४१२० व होन्डा अॅक्टीव्हा मोपेड ६ जी नंबर प्लेट नसलेली असे एकुण ०२ वाहने एकुण किंमती अंदाजे १,३०,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी लोहीत मतानी, पोलीस उप आयुक्त (परि, क. १), सतिश गुरव, सहा. पोलीस आयुक्त (एम.आय.डी.सी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, एम.आय.डी.सी पोलीस ठाणे ने वपोनि, प्रविण काळे, सपोनि. संजय चंसोड, पोहवा. दिपक ठाकुर, स्माईल नौरंगाबादे, गजानन राठोड, पंकज मिश्रा, विवेक झाडे यांनी केली.