ज्ञान – विज्ञान पब्लिक चैरीटेबल ट्रस्टचा महिला दिवस साजरा

नागपूर :-ज्ञान – विज्ञान पब्लिक चैरीटेबल ट्रस्ट अंतर्गत करवीर सोलुशन नागपूर तर्फे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम सिद्धी विनायक हॉल त्रिमूर्ती नगर येथे घेण्यात आला.

सर्व प्रथम करवीर सोलुशनच्या महिलांनी आनंद उत्साहात २७ वर्ष झाल्यामूळे २७ फुगे आकाशात उडविले त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे नागपूरच्या डिस्ट्रिक्ट जज चंद्रिका बैस व लोकोपायलट म्हणजेच रेल्वे चालविणारी प्रथम महिला माधुरी उराडे यांना साडी व मान चिन्ह देऊन यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा छाया वझलवार यांनी केला तसेच पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर रंगारंग कार्यक्रमाची सुरुवात झाली. नृत्य, संगीत आणि कॅटवॉक कार्यक्रम यांचे जज म्हणून लाभलेल्या कांचन  माने आणि बिन्नी खान यांनी स्पर्धेचे निरीक्षण केले. तसेच कार्यक्रमाचे संचालन विनिता पांडे यांनी केले.

त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित राहीलेले सदस्य खालील प्रमाणे सेक्रेटरी सविता मंगलगिरी कोषाध्यक्ष प्रतिमा खटी त्याचप्रमाणे करवीर सोल्युशनचा सदस्या नंदीता सोनी, ज्योती धामोरीकर, संजिवनी चौधरी स्नेहल बऱ्हाणपुरे, पुजा किरनाकर, इंदीरा कबाडे, माधवीताई सुपसांडे, जयश्री मुदलियार, शालिनी मुदलीयार, अश्विनी घाटे, कुमुदिनी देशमुख, मोनिका पात्रीकर, अरुणा जगताप, निलिमा ढोके जुमा जाधव, चैताली दाभेकर, शितल भिलकर उपस्थित होत्या.

@ फाईल फोटो

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com