संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रोड वरील इंडियन पेट्रोल पंप समोरून एक इसम ट्रॅव्हल्स ने अवैध साहित्य भरून असलेले दोन बॅग वाहून नेत असता सदर इसमाचा ट्रॅव्हल्स ड्रॅयव्हर व कंडक्टर सह पैस्याचा वाद घडून आला त्यातच या बॅग मधून उग्र वास येत असल्याने त्याला या बॅग मध्ये काय आहे हे विचारले असता यावरून चांगलाच वाद झाला.याबाबत पोलिसांना माहिती देताच सदर इसमाने ट्रॅव्हल मध्ये दोन्ही बॅग सोडून पसार झाला.तर या दोन्ही बॅग मध्ये 26 किलो 128 ग्राम गांजा भरलेला होता. पोलिसांनी हे दोन्ही बॅग जप्त करून पसार आरोपी कुणाल सिंह रा बिहार विरुद्ध गुन्हा दाखल करीत 5 लक्ष 22 हजार 560 रुपयांचा अवैध गांजा जप्त करण्यात आला.