नागपूर – शनिवार दि. २४ जुन २०२३ रोजी महात्मा गांधी शाळेच्या सभागृहात भाजपा उत्तर नागपुर वकील आघाडीची घोषणा करण्यात आली. ॲड.महानगर वकील आघाडीची ॲड.परिक्षीत मोहिते यांचा अध्यक्षते खाली घोषणा करण्यात आली. वकिल आघाडी चे कार्य प्रत्येक विधानसभा क्षेत्रात वाढिवण्या करीता मंडळ स्तरावर वकील आघाडी ची स्थापन करण्याचे निर्देश अध्यक्षानी दिले, त्या अनुषंगाने सर्वप्रथम उत्तर नागपूर वकील आघाडीची ॲड. नितीन रामटेके यांनी घोषणा केली. विशेष म्हणजे नागपुर इतिहासात पहिल्यांदाच उत्तर नागपुर आघाडीची एवढ्या मोठ्या संख्येनी घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवीण दटके उपस्थित होते व त्याच प्रमाणे माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार मिलिंद माने, विधी आघाडी माजी प्रदेश सचिव ॲड. उदय डबले, शहर अध्यक्ष ॲड. परिक्षीत मोहिते, पालक ॲड. कांचनताई करमरकर, शहर उपाध्यक्ष ॲड. प्रफुल मोहगावकर, महामंत्री संजय बांगाले, रामभाऊ अंबुलकर, मंडळ अध्यक्ष संजय चौधरी, ॲड. नितीन तेलगोटे, ॲड. प्रकाश जैसवाल प्रामुख्याने हजर होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डिम्पी बजाज, नवनीत सिंग तुली, भोजराज डुंबे, मन्डल महामंत्री गणेश कानतोडे, जितू ठाकूर, सुरेन्द्र यादव,उपाध्यक्ष शशांक चौबे,संपर्क प्रमुख विश्वनाथ राठोर, स्वप्नील डुबेवार, ॲड. गिरीश खोरगडे, नचिकेत व्यास, माजी नगर सेविका सुषमा चौधरी, प्रमीला मथरानी, नगर विधी महामंत्री अमोल कावरे, संकेत यादव, अमोल बोरकर. यावेळी अध्यक्ष ॲड. नितीन रामटेके यांनी ३४ वकिलांना विविध पद देऊन नियुक्ती पत्र बहाल केले त्यामध्ये ॲड. भगवान लोणारे- उपाध्यक्ष, ॲड. विलास भांडे- उपाध्यक्ष, ॲड. परमानंद ठाकूर- उपाध्यक्ष, ॲड.जितू धुलियानी- उपाध्यक्ष, ॲड. शारदा तिवारी- उपाध्यक्षा, ॲड. रुबी पाल- उपाध्यक्षा, ॲड.विकास त्रिवेदी- उपाध्यक्ष, ॲड.गिरीश दिपवानी- महामंत्री, ॲड.टिळक लारोकर- महामंत्री ॲड. अर्चना बांगर– महामंत्री, ॲड.अनुज सेठी- महामंत्री, ॲड. राहुल तिवारी- प्रसिद्धि प्रमुख, ॲड. संदीप साखरे- संपर्क प्रमुख व २०० लोकांचा समक्ष कार्यकारिणी घोषणा केली .
कार्यक्रमामध्ये माजी आमदार गिरीश व्यास, मिलिंद माने, ॲड. उदय डबले व संजय चौधरी, ॲड.परिक्षीत मोहिते, ॲड. नितीन तेलगोटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ॲड. नितिन रामटेके यांनी मांडली. त्यानी उत्तर नागपूर मध्ये भविष्यात विधी मार्गदर्शन केंद्र उघडून जनते मध्ये कायदे बाबत शिक्षण व मार्गदर्शन करून जनतेची सेवा करण्याचे आश्वासन दिले. या केंद्रा मध्ये गरीब असहाय जनतेस मोफत कायदे विषयक सल्ला, मार्गदर्शन व शिक्षण देऊन न्यायालयात वाढत चाललेल्या कोर्ट केसेसला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यात येईल. असा उद्देश्य व्यक्त केला.
कार्यक्रमाचे मंच संचालन ॲड.गिरीश दिपवानी यांनी केला व आभार प्रदर्शन ॲड.अर्चना बांगर यांनी केले.