नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्याद्वारे छापलेल्या नवीन वर्षाच्या (2023) कॅलेंडर मध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठला च्या चित्रावर (चेहऱ्यावर) विचित्र बकरा व मस्जिदचे चित्र छापून असंख्य हिंदू धर्मीय लोकांचं अपमान केला आहे. या करिता भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरा तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गणेशपेठ चौक येथील नागपूर शहर कार्यालयासमोर टाळा मृदंगाच्या गजरात भजन आंदोलन भा.ज.यु.मो प्रदेश महामंत्री शिवानी दानी वखरे,भा.ज.यु.मो शहर अध्यक्ष परेंद्र (विक्की) पटले, भा.ज.यु.मो शहर महामंत्री सचिन करारे यांच्या नेतृत्वात व भा.ज.यु.मो पूर्व नागपूर अध्यक्ष सन्नी राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी एजाज शेख, आशीष मेहर, अन्नू यादव, विकास रंहागले, शुभम पथाले, नितिन इटनकर, गोविंदा काटेकर, जयेश बिहारे, रित्रिक कापसे, शैलेश नेताम, कपिल लेंडे, शंकर विश्वकर्मा, विक्की बगेले, एजाज शेख, अन्नू यादव, सुमित पडोले, निलेश रारोकर, विकास रहागले, शुभम पथाले, तुषार ठाकरे, विक्की पारस्कर, नितिन इटनकर, आशीष कलसे, बादल दुबे, शैलेश नेताम, जयश बिहारे, सचिन वानखेड़े, अतुल कावले व इतर भा.ज.यु.मो चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.