बाल धोरण व कृती आराखड्यासंदर्भात हरकती, सूचना ३० जून पर्यंत मागविण्याचे नागरिकांना आवाहन

नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या बाल धोरण व कृती आराखड्या संदर्भात ३० जून २०२४ रोजी सायंकाळ 6.15 वाजेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना करण्याचे आवाहन, महिला व बाल विकास विभाग, नागपूरचे विभागीय उपायुक्त ऐ.जे.कोल्हे यांनी केले आहे.

‘महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२’ मध्ये आवश्यक बाबी, सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसूद्याची शब्दरचना, व्याकरण याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास आयुक्तांलय, 28 राणीचा बाग, जून्या सर्किट हाऊस जवळ, पुणे 01 या पत्यावर अथवा childpolicy@gmail.com या ई-मेल वर हरकती व सूचना पाठविण्यात यावे.

बाल धोरणाचा प्रारुप मसूदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने ‘महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२’ तयार केला आहे. हा प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये राज्यशासनाने https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतसस्थळावर प्रसिध्द केला आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बँकांनी खरीप पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट 15 जूनपर्यंत पूर्ण करावे - डॉ.पंकज आशिया

Thu Jun 6 , 2024
– खरीप पिककर्ज वाटपाचा आढावा यवतमाळ :- खरीप हंगामात शेतीसाठी शेतकऱ्यांना पिककर्जाची आवश्यक्ता असते. जिल्ह्यातील सर्व बॅकांना व त्यांच्या शाखांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. बॅंकांनी आपले वाटपाचे उद्दिष्ट दि.15 जूपपर्यंत पुर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांकडून खरीप पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!