कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात महिलेला गंभीर जख्मि करून लुबाडणूक करणारा आरोपी निघाला अट्टल चोरटा 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– आरोपी कडून चोरीच्या मुद्देमालासह पाच मोटरसायकल जप्त

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी कंटोन्मेंट बोर्ड परिसर माल रोड बंगला नंबर 10 येथे 17व फेब्रुवारीला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एका वृद्ध महिलेला गंभीर जखमी करून लुटणारा आरोपी अटल चोरटा निघाला असून या अटक चोरट्या आरोपी चे नाव अरविंद चंद्रभान कुंभरे वय 25 वर्षे रा खुरसापार ,ता सावनेर असे आहे.या आरोपीला भादवी कलम 397 354,354(अ),354 (ब)452,506(ब)अनव्ये अटक करण्यात आले असून त्याचे जवळून जुनी कामठी पोलीसानी चोरीच्या मुद्देमालासह पाच मोटरसायकल असा एकूण एक लक्ष २१ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे .

जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अटक आरोपीने दिनाक 17 फेब्रुवारी 2024 ला कामठी कंटोन्मेंट बोर्ड परिसरातील माल रोड बंगला नंबर 10 येथे अतीनदर अजितसिंग कौर वय 62 या महिलेच्या घरात अवैधरित्या शिरून तिच्या डोक्यावर घरातील लोखंडी प्रेस ने वार करून गंभीर जखमी करून त्यांचे जवळून 58 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ,मोबाईल घेऊन पसार झाला होता मात्र जुनी कामठी पोलिसांनी तर्कशक्तीचा उपयोग करून आरोपीस अवघ्या चार तासात मोबाईल फोनच्या लोकेशन वरून गंगा जमुना नागपूर येथून अटक केली होती त्याची पोलीस कोठडी घेतली असता त्याने कोंढाळी जिल्हा नागपूर सीताबर्डी नागपूर पोलीस ठाणे हद्दीतून एक्टिवा व मोटरसायकल गाडी चोरी केल्याचे कबूल केले होते त्याचे जवळून पोलिसांनी एम एच 31 सीएफ 7805 ,एमएच 40 सी 1526 ,एमच 31 केआर 7093, एमएच 40 एडी 1029, एमएच 40एन 9408 ह्या मोटरसायकल जप्त करून चोरीस गेलेल्या मुद्देमालातील चांदीची चैन,चांदीचे टॉप्स,सोन्याची चैन,नगदी 4 हजार रुपये ,एक महागडा मोबाईल असा एकूण 1लाख 21 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी अरविंद कुमरे हा अट्टल चोरटा असून त्याचे जवळून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकिस येणार असल्याचे ठाणेदार दीपक भिताडे यांनी सांगितले आहे वरील कारवाई पोलीस उपयुक्त निकेतन कदम ,सहाय्यक पोलीस उपयुक्त विशाल शिरसागर, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार दीपक भिताडे ,पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर ,गोपीनाथ राखुंडे ,हेडकॉन्स्टेबल रवी गावंडे ,लक्ष्मीकांत बारलिंगे ,अभय मुन, माया अमृत ,विवेक दोरसेटवार, विजय गाते, रमेश बंजारा, शारिक खान ,आशिष यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पुर्ण

Tue Feb 27 , 2024
Ø ग्रामविकास मंत्री व पालकमंत्र्यांकडून पाहणी Ø कार्यक्रमस्थळीच घेतला तयारीचा आढावा यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि.28 फेब्रुवारी रोजी येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन व पालकमंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमस्थळाला भेट देऊन पाहणी केली व तेथेच तयारीचा आढावा घेतला. यावेळी आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.निलय नाईक, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com