बाल धोरण व कृती आराखड्यासंदर्भात हरकती, सूचना ३० जून पर्यंत मागविण्याचे नागरिकांना आवाहन

नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या बाल धोरण व कृती आराखड्या संदर्भात ३० जून २०२४ रोजी सायंकाळ 6.15 वाजेपर्यंत नागरिकांकडून हरकती व सूचना करण्याचे आवाहन, महिला व बाल विकास विभाग, नागपूरचे विभागीय उपायुक्त ऐ.जे.कोल्हे यांनी केले आहे.

‘महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२’ मध्ये आवश्यक बाबी, सूचना, सुधारणा तसेच मराठी भाषेमध्ये भाषांतर करण्यात आलेल्या मसूद्याची शब्दरचना, व्याकरण याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. महिला व बाल विकास आयुक्तांलय, 28 राणीचा बाग, जून्या सर्किट हाऊस जवळ, पुणे 01 या पत्यावर अथवा childpolicy@gmail.com या ई-मेल वर हरकती व सूचना पाठविण्यात यावे.

बाल धोरणाचा प्रारुप मसूदा तयार करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती व शासनाचे अधिकारी यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने ‘महाराष्ट्र राज्य बाल धोरण व कृती आराखडा २०२२’ तयार केला आहे. हा प्रस्तावित बाल धोरण व कृती आराखडा इंग्रजी व मराठी भाषेमध्ये राज्यशासनाने https://womenchild.maharashtra.gov.in व https://www.wcdcommpune.com या संकेतसस्थळावर प्रसिध्द केला आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बँकांनी खरीप पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट 15 जूनपर्यंत पूर्ण करावे - डॉ.पंकज आशिया

Thu Jun 6 , 2024
– खरीप पिककर्ज वाटपाचा आढावा यवतमाळ :- खरीप हंगामात शेतीसाठी शेतकऱ्यांना पिककर्जाची आवश्यक्ता असते. जिल्ह्यातील सर्व बॅकांना व त्यांच्या शाखांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे. बॅंकांनी आपले वाटपाचे उद्दिष्ट दि.15 जूपपर्यंत पुर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केल्या.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांकडून खरीप पिककर्ज वाटपाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com