कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते आसाम व अरुणाचल प्रदेशला ऍम्ब्युलन्स भेट

मुंबई :- कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी आसाम व अरुणाचल प्रदेश राज्य सैनिक कल्याण मंडळांना प्रत्येकी एक ऍम्ब्युलन्स भेट देण्यात आली. हुतात्मा जवान तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या अथर्व फाउंडेशनच्या वतीने दोन्ही राज्यांना ऍम्ब्युलन्स भेट देण्यात आली.

देशाचे वीर जवान प्रतिकुल परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात. अश्यावेळी हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी काम करणे नागरिकांचे कर्त्यव्य असते असे सांगून राज्यपालांनी अथर्व फाउंडेशनचे अभिनंदन केले. अथर्व फाउंडेशन ही संस्था देशाच्या कानाकोपऱ्यातील हुतात्मा जवानांच्या मुला – मुलींच्या शिक्षणासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.

कार्यक्रमाला अथर्व फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार सुनील राणे, निमंत्रक कर्नल (नि.) सुधीर राजे, कर्नल एस. चॅटर्जी, डॉ बालाजी शिंदे व आसाम रायफलचे अधिकारी व जवान उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यस्तरावर डॅशबोर्ड विकसित करणार - कृषिमंत्री धनंजय मुंडे

Thu Jul 27 , 2023
मुंबई :- बोगस खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर विभागामार्फत कारवाई सुरू आहे. खतांच्या लिंकिंग करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना विभागामार्फत नोटीस पाठवलेल्या आहेत. राज्यात कुठेही खतांचा काळाबाजार होऊ नये, यासाठी राज्यस्तरावर डॅशबोर्ड विकसित करण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनजंय मुंडे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात व विशेषतः नागपूर जिल्ह्यात बोगस खतांच्या तपासणीचे काम बंद असल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!