नागपूर :-अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधुन नागपूर ग्रामीण जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने तुळशीराम पाटील इंजिनियरिंग कॉलेज बुटीबोरी येथे प्रमुख कार्यक्रम घेउन २५० विदयार्थ्यांना नशामुक्ती अभियांना बाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमात विदयार्थ्यांना अमली पदार्थाचे सेवन करणार नाही अशी शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला सहस नशामुक्ती केंद्राचे डॉ. योगेश किटे ह्यांनी तसेच sdpo पूजा गायकवाड यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कॉलेजाचे अध्यक्ष मोहन पाटील गायकवाड हे सुद्धा प्रामुख्याने हजर होते. जिल्हयात प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत संबंधित sdpo व ठाणेदार यांनी जनजागृती करून शाळेत व कॉलेजला व्यसनमुक्ती अमली पदार्थाचे सेवानाचे दुष्परिणाम याबाबत कार्यक्रम घेण्यात आले तसेच रॅली काढण्यात आल्यात. असे एकूण २३ ठिकाणी कार्यक्रम घेण्याता आले.
तसेच अमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधुन विविध गुन्ह्यातील ४६ किलो गांजा ४६०००० रु. चा भांडेवाडी येथील केंद्रात पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांचे उपस्थित नाश करण्यात आला.