‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक शशिकांत कुलथे यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक शशिकांत कुलथे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर शुक्रवार दि. 7 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

शिक्षण क्षेत्रातील मानाचे असलेले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारार्थीमध्ये बीडचे शिक्षक शशिकांत कुलथे यांचा समावेश आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिलखुलास कार्यक्रमात माहिती जाणून घेतली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास महत्वाचा असल्याचे  कुलथे यांनी सांगितले आहे. निवेदक प्रा.आजीनाथ शेरकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

Fri Oct 7 , 2022
मुंबई :-  राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. विधानसभा मतदारसंघाच्या 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights