गडचिरोली :- राजेंद्र साबळे, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर, बसवराज मास्तोळी, जि. अ. कृ. अ. गडचिरोली व पी. पी. वाहाने उपविभागीय कृषी अधिकारी, गडचिरोली यांनी मौजा जयनगर ता चामोर्शी येथील नेताजी शेतकरी समूह गट यांनी, गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरण योजना अंतर्गत लाभ घेतलेल्या ऑईल मिल संच, कृषी औजारे बँक , मिनी डाळ मिल इ घटकाची तपासणी व शेतकऱ्यांना करडई व मोहरी लागवड बाबत मार्गदर्शन केले.
त्यानंतर लाभार्थी तुळशीराम सातपुते रा. कुरुळ यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात सन 2021-22 अंतर्गत लाभ भात मळणी यंत्राची तपासणी केली. तसेच मौजा तळोधी मो येथील PMKSY 2021- 22 अंतर्गत ठिंबक सिंचन लाभार्थी मनोहर निखाडे यांच्या शेतातील ठिंबक, प्लास्टिक मल्चिंग वर झेंडू लागवड क्षेत्रास भेट देऊन मार्गदर्शन केले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चामोर्शी येथील अधिकारी, कर्मचारी, शेतकरी गटाचे अध्यक्ष , सचिव व इतर शेतकरी उपस्थित होते.