नागपूर :- विदर्भाचा महत्वाकांक्षी गोसीखुर्द जलपर्यटन व राष्ट्रीय प्रकल्पाची पाहणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज 12 नोव्हेंबर रोजी करणार आहेत. त्यासोबतच भंडारा जिल्ह्यात आयोजित विविध उद्घाटन, लोकार्पण व भूमीपूजन कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी 12 वाजता त्यांचे विशेष विमानाने नागपूर येथे आगमन होणार आहे. त्यानंतर हेलीकॅप्टरने ते गोसीखूर्दला रवाना होतील.
शनिवार 12 नोव्हेंबर दुपारी 12 वाजून 20 वाजता पवनी तालुक्यातील गोसीखुर्द धरण हेलिपॅड येथे आगमन व गोसीखुर्द जलपर्यटन तथा प्रकल्पाची पाहणी करतील. दुपारी 1.20 वाजता गोसेखुर्द धरण हेलिपॅड येथून हेलिकॉप्टरने भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथील हेलीपॅडवर उतरुन एम.आय.टी. दुपारी 1.40 वाजता भंडारा शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल.
दुपारी 2 वाजता नाशिक नगर बुध्द विहार येथे ई-लायब्ररीचे लोकार्पण व शहीद स्मारक येथे बगिचा सौंदर्यींकरणाचे भूमीपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी 2.20 वाजता मुस्लीम लायब्ररी चौक येथील नगर परिषद गांधी विद्यालय इमारतीचे भूमीपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहतील तर दुपारी 2.35 ते 3 वाजेपर्यंत खातरोड रेल्वे मैदान, माधव नगर येथील आयोजित खामतलाव, नगर परिषद येथील सौंदर्यीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन व भुयारी गटार योजनेतील कामाचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील.
दुपारी 3.10 वाजता खासदार सुनिल मेंढे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, दुपारी 3.30 वाजता खातरोड रेल्वे मैदान, माधवनगर येथे जाहीर सभेस संबोधीत करतील. सायंकाळी 4.45 वाजता एम.आय.टी. शहापूर हेलिपॅड भंडारा येथून हेलिकॉप्टरने नागपूरकडे प्रयाण करतील.