जिवानीशी ठार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीविरूद्ध कारवाई

पो.स्टे. रामटेक :- अंतर्गत १० कि. मी अंतरावर मौजा नंदापुरी येथे दिनांक १४/०६/२०२३ चे १४.१५ वा. ते १४. ३० वा. चे दरम्यान यातील फिर्यादी नामे- नंदा रामेश्वर मदनकर वय ४५ वर्ष, रा. नंदापुरी ता. मौदा जि. नागपूर व आरोपी नामे सुधाकर घुसाराम मदनकर, रा. नंदापुरी ता. मौदा जि. नागपूर हे नातेवाईक असून एकाच गावात राहतात. दिनांक १४/०६/ २०२३ रोजीचे दुपारी ०२/१५ वा. आरोपी सुधाकर मदनकर यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर फिर्यादीचे पती रामेश्वर मदनकर यांच्या अंगावर आणुन त्यांना धडक देवून अंगावर नेवून उद्देशपुर्वक जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी ही तिच्या पतीकडे धावत गेली असता फिर्यादीला सुद्धा आरोपीने ट्रॅक्टरने जिवे मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे कलम ३०७, ३२४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के पोलीस स्टेशन रामटेक हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवानिशी ठार करणाऱ्या आरोपीला आजिवन कारावासाची शिक्षा

Fri Jun 16 , 2023
पो.स्टे. कळमेश्वर :- दिनांक १७/०९/२०११ चे २३.४६ वा.च्या सुमारास यातील आरोपी नामे- विजय कवडु जाधव, वय ३३ वर्ष, रा. गोंडखैरी ता. कळमेश्वर जि. नागपूर याने आपल्या पत्नीचे मृतक नामे- आकाश गुलाब टोंगे, वय २० वर्ष रा. गोंडखैरी ता. कळमेश्वर जि. नागपूर याचे सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मृतकास आपल्या घरी बोलावुन त्यास नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याचे डोके फरशीवर आपटुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com