अवैध वाळु वाहतुकीचे दोन ट्रक पकडले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– चार आरोपी अटक, ४५,५६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त. 

कन्हान :- परिसरातील नदीची वाळु चोरी करण्यात येत असुन शनिवार रविवार सुट्टीच्या दिवसी बिनधास्त मोठया प्रमाणात होत असल्याने कन्हान पोलीसांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या दोन ट्रकांना पकडुन चार आरोपींना अटक करून त्यांचे ताब्यातील ४५ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमा लाची जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसां कडुन प्राप्त माहिती नुसार बुधवार ते गुरुवार (दि.१६) मे च्या मध्यरात्री कन्हान पोलीस परि सरात पेट्रोलिंग करित असतांना गुप्त माहिती मिळाली कि चारपदरी महामार्गावरिल कन्हान नदी पुल खंडाळा शिवारात आणि रोहना घाट येथे अवैध वाळु चोरीची वाहतुक होत आहे. अश्या माहितीवरुन पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन १) दहा चाकी टिप्पर ट्रक क्र. एमएच ४९ बीझेड ८८२२, २) टाटा कंपनीचा ६ चक्का ट्रक क्र. एमएच ४० एन ०४४६ असे दोन ट्रक पकडुन पोलीसांनी वाहन चालक १) नागेंद्र देवकी पाहन , २)सोहेल खान सरदार खान, ३) मोहन शंकर तुमसरे , ४) मोहम्मद हसीब सर्वर खान असे सांगितले. पोलीसांनी वाळु बाबत राॅयल्टी व कागदपत्र विचारले असता राॅयल्टी नसल्याचे सांगितल्याने पोलीसांनी चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन दोन ट्रक किंमत ४५,००,००० रु, साडे नऊ ब्रास वाळु किंमत ५५००० रु, ५ घमेले व १० पावडे किस्मत १५०० रु असा एकुण ४५,५६ ,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन १) नागेंद्र देवकी पाहन, २) सोहेल खान सरदार खान, ३) मोहन शंकर तुमसरे, ४) मोहम्म द हसीब सर्वर खान यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचा मार्गदर्शनात, सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान, उपनिरीक्षक प्रविण हारगुडे, एकनाथ राठोड, महेश बिसेन, वैभव बोरपल्ले, अजय भगत, सम्राट वनपर्ती, निखिल मिश्रा, रवि मिश्रा, दिपक कश्यप सह पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्विरित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 84 प्रकरणांची नोंद

Fri May 17 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता. 16) रोजी उपद्रव शोध पथकाने 84 प्रकरणांची नोंद करून 35 हजार 100 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com