अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीताविरूद्ध गुन्हा नोंद,वाहनासह एकूण ९०,९३,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

– नागपूर ग्रामीण विशेष पथकाची कारवाई

भिवापूर :-दिनांक ०१/०४/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे भिवापूर हहीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोलीस ठाणे भीसी जिल्हा चंद्रपूर कडून भिवापूर मार्गे अमरावतीकडे अवैधरीत्या विनापरवाना रेती एलपीमध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून सालेभ‌ट्टी फाट्याजवळ नाकाबंदी केली असता दोन संशयित टिप्पर एकामागे एक येतांनी दिसुन आले. टाटा कंपनीची १६ चक्का एल पी वाहन क्र. एम.एच. २७/डि.पी. ११९९ चा चालक आरोपी नामे- १) सय्यद मोबीन सय्यद अलीम, वय ३३ वर्ष, रा. कलीमनगर, ट्रान्सपोर्टनगर जवळ अमरावती २) मनिश जंगु धुर्वे, वय २४ वर्ष, रा. कसाईखेडा, तह. धारणी, जि. अमरावती, टाटा कंपनीची १६ चक्का एल पी वाहन क्र. एम.एच. २७ डि.एम. ५२७९ चा चालक आरोपी नामे ३) संजय रामाजी गाढवे, वय ४० वर्ष, रा. वार्ड क्र. ६ नेरपिंगळ्ळाई, तह. मोर्शी, जिल्हा अमरावती, ४) अक्षय अरुण धुर्वे, वय ३० वर्ष, रा. वार्ड क्र. ५ नेरपिंगळाई, तह. मोर्शी, जिल्हा अमरावती यांना स्टाफने थांबवून पाहणी केली असता दोन्ही वाहनामधील एकुण अंदाजे ३० ब्रास रेती मिळून आल्याने सदर वाहन चालकास ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपींच्या ताब्यातून १) टाटा कंपनीची १६ चक्का एल पी वाहन क्र. एम.एच. २७/डि. पी. -११९९ किंमती अंदाजे ४८,००,०००/- रू. मध्ये १५ द्वास रेती किमती ७५,०००/-रू. २) वेगवेगळे कंपनीचे मोबाईल किमती ४३,०००/-रू, ३) टाटा कंपनीची १६ चक्का एल पी वाहन क्र. एम.एच. २७ डि.एम. ५२७९ किंमती ४१,००,०००/- रू. मध्ये अंदाजे १५ ब्रास रेती किमती ७५,०००/-रु. असा एकुण ९०,९३,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी नामे १) सय्यद मोबीन सय्यद अलीम, वय ३३ वर्ष, रा. कलीमनगर, ट्रान्सपोर्टनगर जवळ अमरावती २) मनिश जंगु धुर्वे, वय २४ वर्ष, रा. कसाईखेडा, तह. धारणी, जि. अमरावती, टाटा कंपनीची १६ चक्का एल पी वाहन क्र. एम.एच. २७ डि.एम. ५२७९ चा चालक आरोपी नामे-३) संजय रामाजी गाढवे, वय ४० वर्ष, रा. वार्ड क्र. ६ नेरपिंगळाई, तह. मोर्शी, जिल्हा अमरावती, ४) अक्षय अरुण धुर्वे, वय ३० वर्ष, रा. वार्ड क्र. ५ नेरपिंगळाई, तह. मोर्शी, जिल्हा अमरावती असे एकुण ०४ आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे भिवापूर येथे लम ३७९,१०९,३४ भारतीय दंडविधान संहीता-१८६०, सहकलम ४८ (७).४८ (८) महाराष्ट्र जमीन नहसुल अधिनियम-१९६६, सहकलम ४,२१ खानी आणि खनीजे (विकास आणि नियमन) अधिनियम १९५७, सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतीबंधक अधिनियम १९८४ अन्वये पो. स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रमीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, पोलीस हवालदार ललीत उईके, पोना प्रणय बनाफर, पोलीस अंमलदार कार्तिक पुरी, बालाजी बारगुले विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गाईच्या गोठ्यातील 5 गोवंश जनावरे चोरीला

Thu Apr 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रविदास नगर जवळील खुल्या मैदानात असलेल्या अतिष यादव यांच्या गाईच्या गोठ्यात बांधून असलेले चार गायी व एक सांड असा एकूण 98 हजार रुपये किमतीचे 5 गोवंश जनावरे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज सकाळी 6 वाजता उघडकीस आली.यासंदर्भात फिर्यादी अतिष यादव वय 46 वर्षे रा गवळीपूरा कामठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com