नागपूर :- नागपुरातील टिमकी -भानखेडा भागात पिल्लुपाण्डु मंदिर पटांगणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम मोठया उत्साहात महिलांनी संपन्न केली. या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून कल्पना अड्याळकर ,माया धार्मिक ,शकुंतला वट्टीघरे होत्या.
त प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस ॲड. नंदा पराते म्हणाल्या भारताच्या इतिहासात राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात महान कार्य केले. राजमाता जिजाऊंचे एकूणच व्यक्तिमत्व एक माता म्हणून प्रभावशाली , समर्थ ,स्वावलंबी ,स्वाभिमानी व आत्मविश्वासाचे होते. राजमाता जिजाऊ यांच्या कर्तव्याचा व व्यक्तिमत्वाचा आदर्श घेऊन शिवाजी घडवावेत.
ॲड. नंदा पराते पुढे म्हणाल्या कि छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि संकटाशी मुकाबला करण्यासाठी करावे लागणारे बिनचूक नियोजन आणि त्या नियोजनप्रमाणे काम पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले व्यवस्थापन हे गुण त्यांच्या ठायी होते म्हणूनच स्वराज्य निर्माण करणे शक्य झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे त्या काळात एक आगळेवेगळे राजे म्हणून जाणले गेले. प्रजेला सवलती देणारा राजा ही संकल्पनाच त्या मध्ययुगामध्ये क्रांतीकारक ठरलेली होती. महात्मा जोतीबा फुले यांनी या महान राजा शिवाजी महाराजांची समाधी रायगड मध्ये शोधून काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे म्हणून महात्मा जोतिबा फुले यांनी इ.स. १८७० पासून शिवाजी जयंती सुरू केली, ती पहिली शिवजयंती होती.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वैशाली देविकर ,करिष्मा नागोसे,प्रमिला खडगी,गिरिजा पराते, मनीषा कच्छीवाले,विद्या नगरधने ,मंजू जमादार,छाया पौनीकर यांनीही अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या माध्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी महिलामध्ये जन-जागृती करण्यात आली.