केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे कापसावर एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन

नागपूर :- केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापनकेंद्र नागपूर क्षेत्रीय कार्यालयाद्वारे महाराष्ट्रातील 40 कृषी अधिकाऱ्यांसाठी कापुस पिकाच्या एकीकृत कीड व्यवस्थापनावर 1 महिन्याचे दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन 27 सप्टेंबर बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता होणार असून याप्रसंगी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. त्याचप्रमाणे वनस्पती संरक्षण विभाग फरीदाबादचे सल्लागार डॉ. जे पीसिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद हे प्रामुख्याने उपस्थित राहतील अशी माहिती क्षेत्रीय एकीकृत किड व्यवस्थापन केंद्र नागपूरचे संयुक्त संचालक डॉ. ए.के.बोहरिया यांनी आज नागपूर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी उपसंचालक डॉ. मनीष मुंडे, पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक शशिन राय उपस्थित होते.

27सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर या एक महिना चालणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कृषीअधिकाऱ्यांना जैविक नियंत्रणाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचावे याचे प्रात्यक्षिक अभ्यास त्याचप्रमाणे व्याख्यानयांच्याद्वारे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती बेहरा यांनी दिली . नागपुरातीलक्षेत्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्रांच्या अंतर्गत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश गोवा, गुजरात या पाच राज्यातील राज्यशासनाला कीड व्यवस्थापनाबाबतचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.केंद्रीय एकीकृत कीड व्यवस्थापन केंद्र नागपूरद्वारे शेतकऱ्यांना कीड व्यवस्थापन करिता यांत्रिक पद्धतीमध्ये सापळ्यांची रचना,रासायनिक नियंत्रणासाठी निंबोळी अर्कासारख्या कीटनाशकाची निवडत्याचप्रमाणे जैविक नियंत्रणासाठी मित्र कीटकांच्या व्यवस्थापनात बाबत शास्त्रोक्त पद्धतीने माहिती दिली जात असून शेतकऱ्यांना कीटकनाशकांची निवड कशी करावी याबाबत देखील मार्गदर्शन केले जाते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई  

Wed Sep 27 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.26) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रितेश गृह उदयोग, हुडकेश्वर नागपूर यांच्यावर दुकानाचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रेली पथॉलॉजी लॅब, रामना मुर्ती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com