टाकी स्वच्छता – टाकळी सीम ESR मध्ये पाणी पुरवठा प्रभावित राहणार…

#बाधित भागात टँकरचा पुरवठा नाही…

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर नागपूरच्या नागरिकांना उच्च-गुणवतेचे पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याच्या समर्पित प्रयत्नात, नागपूर महानगरपालिका-ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) ने गुरुवार, 22 फेब्रुवारी 2024 रोजी टाकळी सीम ESR च्या साफसफाईचे वेळापत्रक जाहीर केले.

टाकी साफ करण्याच्या प्रक्रियेदरम्यान, खालील भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होईलः

टाकळी सीम ईएसआर :यशोदा नगर, टाकळी सीम झोपडपट्टी, आंबेडकर सोसायटी, जलविहार कॉलनी, मंगल धाम सोसायटी, साकेत धाम, दुबे लेआउट, गुड लक सोसायटी भाग २, म्हाडा कॉलनी, नागपूर विद्यापीठ सोसायटी, भगिनी लेआउट, अहिल्या नगर, हिरणवर लेआउट, आनंद नगर, प्रसाद नगर, बजरंग नगर, सर्वे नगर, अध्यापक ले-आऊट, सुमित नगर, शास्त्री ले-आऊट, हिंगणा रोड, एसबीआय कॉलनी, एलआयजी एमआयजी, भांगे विहार, गोर्ले ले-आऊट, उज्वल सोसायटी, भाग्यश्री लेआउट,आझाद हिंद नगर, नेल्को सोसायटी, द्रोणाचार्य नगर, अष्टविनायक नगर, प्रगती नगर,

टाकळी सीम बूस्टर पंपिंग पुरवठा क्षेत्रः

संत गाडगे नगर, राजेंद्र नगर, लुंबिनी नगर, कल्याण नगर, वासुदेव नगर, सॅमसंग लेआउट, प्राजक्ता अपार्टमेंट, वॉटर ग्रीन सोसायटी अपार्टमेंट, गुडलक सोसायटी भाग १.

टाकीच्या साफसफाईच्या कालावधीत, या बाधित भागात पाणीपुरवठा होणार नाही, तसेच पाण्याची टैंकर सेवा देखील तात्पुरती अनुपलब्ध असेल. नागरिकांना विनंती आहे की या अत्यावश्यक देखभाल कार्यादरम्यान होणारी गैरसोय कमी करण्यासाठी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा.

NMC-OCW ने उपरोक्त प्रभावित भागातील नागरिकांना आवाहन केले आहे आणि या काळात नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा केली आहे.

पाणीप्रवठ्याबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक NMC-OCW हेल्पलाइन क्रमांक १८०० २६६ ९८९९ वर संपर्क साधू शकतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र की बिजली कंपनी की मनमानी - ॲड.मेहमूद खान

Wed Feb 21 , 2024
नागपूर :- स्वातंत्र्य संग्राम सेनानी मजीद खान फाऊंडेशन नागपूर के तरफ से महाराष्ट्र के नागरिकों लिए लढ रही है बताया जाता है की, पजांब, दिल्ली, राजस्थान, तेलंगाना राज्यों में 200 युनिट बिजली मुफ्त में दि जा रही है। महाराष्ट्र में घर घर जाकर जनता के मिटर कॉटे जा रहे है। यह महाराष्ट्र के नागरिकों पर बहोत बड़ा अन्याय है। महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com