विद्युत विभागाच्या जुलमी निर्णयाविरोधात आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

– भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी दिला इशारा
भंडारा :- विद्युत विभागाच्या जुलमी निर्णयाविरोधात राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ऊर्जामंत्री देवेंद्र फडणविस यांना १४ फेब्रु.२०२४ रोजी निवेदन देवुनसुध्दा कोणतीच दखल घेण्यात आली नाही. या निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता विद्युत वितरण विभाग भंडारा, जिल्हाधिकारी भंडारा, पोलिस अधीक्षक भंडारा, तहसीलदार तहसील कार्यालय भंडारा तसेच विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठविण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी दि.२९ फेब्रुवारी २०२४ पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज २९ फेब्रुवारी २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर ते उपोषण मंडपात अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. जर माझ्या जीवीतास हानी झाल्यास याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असणार असेही यावेळी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी विद्युत विभागास मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने १. थकबाकीदारांना बिल भरण्यात मुदत देण्यात यावी, २. प्रि पेड मिटरसंबंधी पायाभूत सुविधा दिल्याशिवाय लावू नये, ३. प्रि पेड मिटर लावण्यासंबंधी सक्ती करु नये तो ऐच्छिक करावे, ४. शेतकर्‍यांना २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.
सदर मागण्यांवर प्रशासनाने तसेच विद्युत विभागाने गांभीर्याने विचार करावा असेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा-पवनी विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 77 प्रकरणांची नोंद

Thu Feb 29 , 2024
– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईची सुरुवात केली आहे. मंगळवार (ता.२७)रोजी उपद्रव शोध पथकाने 77 प्रकरणांची नोंद करून ४६ हजार ९०० रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights