कामठी चे कनेक्शन निघाले थेट पाकिस्तानसोबत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-भाजप च्या महिला पदाधिकारीचा पाकिस्तानच्या अनोळखी इसमाकडून मोबाईल संभाषनिक विनयभंग

कामठी :- सन 1990 -92 मध्ये झालेल्या जातीय दंगलीमुळे नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानल्या जाणाऱ्या कामठी शहराला अतिसंवेदनशील शहर म्हणून घोषित करण्यात आले असून तशी नोंद महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये आहे. तर या शहराची अतिसंवेदनशिलता इतकी वाढली की या शहराचे थेट संपर्क संबंध पाकिस्तान सोबत असल्याचे निदर्शनास आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. कामठी च्या एका भाजप महिला पदाधिकारीला पाकिस्तान कराचीच्या इमरान नावाच्या इसमाने मोबाईल संभाषणातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला तर या जागरूक महिला पदाधिकारीने यासंदर्भात पुढाकाराची भूमिका घेऊन पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पाकिस्तानच्या त्या इमरान विरुद्ध भादवी कलम 354 (ड),509 अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित भाजप महिला पदाधिकारी ह्या जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील मेन रोड वर वास्तव्यास असून विवाहित आहे. ही महिला आपल्या कार्यप्रणालीतुन सदैव चर्चेत राहत असल्याने सोशल मीडिया व युट्युब चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी पावल्या आहेत .अशाच स्थितीत कामठीतील एका युट्युब चॅनलच्या संबंधितांने या महिलेचा मोबाईल क्रमांक आपल्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जोडले असता या ग्रुप मध्ये जवळपास 234 सदस्य आहेत. त्यात या महिलेचा सुद्धा समावेश करण्यात आला.या महिलेच्या परिचित मध्ये त्या यु ट्यूब प्रतिनिधी शिवाय दुसरा कुणीही ओळखीचा नव्हता तसेच या महिलेची कुठलिही परवानगी न घेता ग्रुप मध्ये ऍड करण्यात आले यातील पाकिस्तान कराची रहिवासी इमरान नावाच्या इसमाने आपल्या मोबाईल क्रमांक धारक 0923093049221 ने या महिलेच्या व्हाट्सएप वर 21 नोव्हेंबर ला दुपारी 1 वाजेदरम्यान हाय असा मेसेज पाठवला यावर सदर महिलेने कुठलेही प्रतिउत्तर न दिल्याने त्याने सव्वा पाच वाजता दोनदा व्हाट्सऐप कॉल आले .परंतु कुठलेही प्रतिउत्तर न दिल्याने सायंकाळी साडे सात दरम्यान नमूद अनोळखी मोबाईल धारकास सदर महिलेने विचारपूस केले असता त्याने माझे नाव इमरान असून मी पाकिस्तान कराची चा रहिवासी आहे असे सांगत व्हाट्सएप ग्रुप चा स्क्रीनशॉट पाठवला तसेच त्या महिलेची व्हाट्सएप डी पी ची फोटो कॉपी करून आप मुझे बहोत अच्छि लगी, मै आपसे बहुत कुछ बात करणा चाहता हू, इसमे हम दोनो का फायदा है आप हमे सपोर्ट करोगे क्या असे व्हाट्सएप संभाषण झाल्यानंतर सदर महिलेने स्पष्ट नकार देत यासंदर्भात त्वरित जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे यांना माहिती देत त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा पुढाकार घेत पोलीस आयुक्त कार्यालय नागपूर गाठून सायबर पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अनोळखी व्हाट्सएप मोबाईल क्र 0923093049221 धारक विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करीत यात अजून गुन्हेगार संख्येत वाढ होणार असून सहभागी आरोपीवर गुन्हा दाखल होण्याची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेने स्वीकारली ६१ क्षयरुग्णांची जबाबदारी

Thu Nov 24 , 2022
पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियान : पोषण आहार किट वितरीत नागपूर :- पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानात हातभार लावत क्षयरोग (टी.बी.) बाधितांच्या आहारासाठी सहकार्य करण्याच्या नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहरातील स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेद्वारे ६१ क्षयरुग्णांची जबाबदारी स्वीकारण्यात आली असून या रुग्णांना पोषण आहार किटचे वितरीत करण्यात येत आहे. सलग दुस-या महिन्यात संस्थेच्यावतीने माजी महापौर  […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com